डोक्यात गोळी लागल्याने अक्षय शिंदेचा मृत्यू

शवविच्छेदन अहवालातून झाले चित्र स्पष्ट

डोक्यात गोळी लागल्याने अक्षय शिंदेचा मृत्यू

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाल्यानंतर त्याचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. त्यात त्याच्या डोक्याला गोळी लागल्याचे स्पष्ट झाले आहे. या एन्काऊंटरच्या सगळ्या प्रकारात चार गोळ्या चालविल्या गेल्याचे दिसते. त्यात तीन गोळ्या या अक्षय शिंदेने चालविल्या आणि एक गोळी त्याच्यावर स्वसंरक्षणासाठी गोळी चालविणाऱ्या संजय शिंदे यांनी चालविली.

 

तपासासाठी ठाणे क्राईम ब्राँचचे पथक तळोजा कारागृहात ट्रान्स्फर वॉरंटसह आले होते. सोमवारी संध्याकाळी चार वाजता पोलिसांनी अक्षय शिंदेला ताब्यात घेतले. संध्याकाळी साडेपाच वाजता तळोजा जेलमधून आरोपी अक्षय शिंदेला घेऊन पोलिस ठाण्याकडे निघाले. व्हॅनमध्ये चार पोलिस उपस्थित होते. त्यात संजय शिंदे, निलेश मोरे, अभिजीत मोरे, हरिश तावडे यांचा समावेश होता. यामधील संजय शिंदे हे ड्रायव्हरशेजारी तर मागच्या बाजूला निलेश मोरेंसोबत दोन पोलीस आरोपीच्या शेजारी बसले होते. भर रस्त्यात आरोपी अक्षय शिंदे शिवीगाळ करू लागला, तो आक्रमक झाला होता आणि मला जाऊ द्या, मी तुम्हाला सगळ्यांना मारून टाकेन असे म्हणू लागला.

त्यानंतर निलेश मोरे यांनी संजय शिंदेंना फोन करून हा प्रकार सांगितला. संजय शिंदे यांनी गाडी थांबविली आणि ते मागे अक्षयच्या बाजुला येऊन बसले. निलेश मोरे हे स्वत: आरोपी अक्षयच्या समोर बसले होते. अक्षय शिवीगाळ करत होता, सहा ते सव्वा सह वाजता पोलीस व्हॅन मुंब्रा-बायपास रोडवर आल्यावर आरोपी निलेश मोरेंच्या जवळील पिस्तुल खेचू लागला. दोघांमध्ये झटापट झाली, त्यावेळीच पिस्तुल लोड झाले आणि एक गोळी फायर झाली, यामध्ये निलेश मोरेंच्या मांडीला गोळी लागून ते जखमी झाले.

हे ही वाचा:

विलेपार्ल्यात दोन अल्पवयीन मुलांना चोर समजून जबर मारहाण

अक्षय शिंदेच्या वडिलांची हायकोर्टात धाव

अमेरिकेतील भारतीय वंशांच्या ज्वेलर्सनी बनविली पंतप्रधानांची ‘हिऱ्यांची प्रतिमा’

इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; १८२ ठार, ७०० हून अधिक जखमी!

अक्षयने पिस्तुल स्वत:कडे घेत संजय शिंदे आणि हरिश तावडे यांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. या दोन्ही गोळ्या पोलिसांना लागल्या नाहीत. यादरम्यान, संजय शिंदे यांनी अक्षयवर एक गोळी झाडत त्याला जखमी केले. त्यानंतर पोलिसांना त्याला कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रूग्णालयात आणले तिथल्या डॉक्टरांनी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या डोक्याला गोळी लागल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाले.

 

Exit mobile version