गुजरातमधील अक्षरधाम मंदिरात २२ वर्षांपूर्वी दहशतावादी हल्ला झाला होता. या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार फराहतुल्ला घोरी याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये तो भारताविरोधात गरळ ओकत असल्याचे दिसून येत आहे. घोरी हा भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याचे आवाहन दहशतवाद्यांना करत असल्याचे दिसत आहे. पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ने हा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.
फराहतुल्ला घोरीचा लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटनांशी संबंध आहे. भारतात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात हिंसाचार पसरविण्याच्या हेतूने घोरीने हा व्हिडिओ तयार केल्याचे बोलले जात आहे. गुप्तचर अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, घोरीचा व्हिडिओ पुढे आल्यानंतर पाकिस्तान आता दावा करू शकतो की हा दहशतवादी हा फरार आहे जो पाकिस्तानमध्ये उपस्थित नाही. गेल्या वर्षी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ‘इसिस’चा एक कट उधळला होता, त्याचाही सूत्रधारही घोरीच होता. दिल्ली पोलिसांनी सांगितले होते की, त्यांनी इस्लामिक स्टेटचे जे दहशतवादी मॉड्यूल उद्ध्वस्त केले ते फरहतुल्ला घोरी चालवत होता. यामध्ये तो आयएसच्या दहशतवाद्यांची भरती करत असे.
हे ही वाचा:
‘मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मागून कोणीतरी धक्का दिला’
पेट्रोल-डिझेलच्या किमती २२ महिने। स्थिर राहिल्यावर घटल्या!
‘एक राष्ट्र, एक निवडणूक घेतल्याने कार्यक्षमता वाढेल, वित्तीय स्थिरता बळकट होईल’
युवकांची दिशाभूल करून त्यांना दहशतवादी मार्गाला लावण्याचे काम घोरी करत असून यासाठी तो सोशल मीडियाचा वापर करतो, अशी माहिती समोर आली आहे. दिल्ली, गुजरात आणि आंध्र प्रदेशात तो वाँटेड आहे. त्याने हैदराबादमध्ये विविध ठिकाणी दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने त्याला २०२० मध्ये दहशतवादी घोषित केले होते.