एनआयएने इसिस मॉड्युल कनेक्शन प्रकरणात शुक्रवारी ठाणे जिल्ह्यातील पडघा येथून अकिब नाचन या संशयिताला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला अकिब नाचन हा मुंबईतील रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साकीब नाचन याचा निकटवर्तीय मानला जातो. एनआयएने मागील महिन्यात मुंबई, पुणे आणि पडघ्यातुन अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवादी यांना पडघ्यात घर भाड्याने घेण्यास मदत केल्याचा आरोप अकिब नाचन याच्यावर आहे.
एनआयएने मागील महिन्यात इसिस संघटनेचे संबंधित मुंबईतील नागपाडा येथून तबिश नासेर सिद्दीकी, पुण्यातील जुबेर नूर मोहम्मद शेख उर्फ अबू नुसैबा आणि ठाण्यातील शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांना अटक केली होती. एटीएस आणि एनआयए ने पुणे, ठाणे आणि मुंबईतून अटक करण्यात आलेल्या संशयित यांचे एकमेकांशी कनेक्शन समोर आले असून हे दोन्ही इसिसने तयार केलेले मॉड्युल असून हे दोन्ही मॉड्युलला इसिसने दोन वेगवेगळी नावे दिली होती.
जुल्फिकार याला पडघ्यातुन अटक केल्यानंतर त्याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत पडघा येथे जुल्फिकार याच्या राहण्याची जबाबदारी अकिब नाचन याच्यावर होती, आणि त्याने जुल्फिकार आणि पुण्यातून अटक करण्यात आलेल्या जुबेर नूर मोहंमद शेख यांना भाड्याने घरे घेऊन दिली होती. एनआयएच्या तपासात समोर आलेल्या माहितीच्या आधारे, एनआयएने तपास सुरू केला होता, दरम्यान शुक्रवारी एनआयएच्या अधिकारी यांनी अकिब नाचन याच्या पडघ्यातील घरी छापेमारी करून त्याला अटक केली आहे.
हे ही वाचा:
सायबर आणि आर्थिक गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सदैव सज्ज रहा
भारतीय नौदलाकडून दुसऱ्या मुंबई हेरिटेज रनचे आयोजन
नवे शैक्षणिक धोरण देशासाठी गेम चेंजर
कोविड घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल
कोण आहे अकिब नाचन?
भिवंडी तालुक्यातील पडघा शेजारी असलेल्या बोरिवली गावात राहणारा अकिब हा बांधकाम व्यवसायिक असल्याचे समजते तसेच रेल्वे बॉम्बस्फोटातील आरोपी साकीब नाचन याचा निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. १५ मे २०२२ रोजी गुजरात एटीएसने त्याला नाशिक येथील एका ढाब्यावरून ताब्यात घेतले होते, त्यानंतर दिल्ली एनआयए ने त्याचा ताबा घेतला होता. फेब्रुवारी २०२२ मध्ये मध्य प्रदेशातील रतलाम येथून दिल्ली एनआयएने अटक करण्यात आलेल्या अमीन फावडा याच्या घरी अकिब गेला होता. यानंतर ते दोघे इम्रान खान याच्या रतनामच्या पोल्ट्री फार्मला गेले, अकिब, अमीन आणि इम्रान यांनी रतनाममध्ये दोन दिवसीय बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले होते, अशी माहिती समोर आली होती.