राज्याचे माजी मुख्य सचिव आयएएस अधिकारी अजोय मेहता यांचा फ्लॅट आयकर खात्याने जप्त केला आहे. पुण्यातील व्यावसायिक अविनाश भोसले यांच्याशी संबंधित संशयित प्रॉपर्टी म्हणून आयकर खात्याने फ्लॅट न विकण्याची अट घातली आहे.
इन्कम टॅक्सने चौकशी पूर्ण होईपर्यंत हा फ्लॅट विकता येणार नाही अशी अट घातली आहे. अजोय मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या आयुष्यातील कमाई देऊन त्यांनी हा फ्लॅट खरेदी केला आहे आणि ते स्वतः आजही या घरात राहतात. बाजारभावाच्या किमतीपेक्षा अधिक किंमत देऊन मी हा फ्लॅट खरेदी केला आणि ती माझ्या आयुष्याची कमाई आहे, असे अजोय मेहता म्हणाले. मंत्रालयाच्या अगदी बाजूला अजोय मेहता यांनी हा फ्लॅट खरेदी केला.
हा फ्लॅट नरिमन पॉइंट येथे आहे. बेनामी व्यवहाराबद्दल आयकर खात्याच्या नजरेत २० जुलैला अजय मेहता आले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सल्लागार म्हणून अजय मेहता यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती. फेब्रुवारी महिन्यात महारेराचे अध्यक्ष म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती.
आयकर खात्याला चौकशीअंती हे दिसून आले की, पुणेस्थित व्यावसायिक अविनाश भोसले यांना हा फ्लॅट मिळाला होता. हा फ्लॅट बेनामी असतानाही मेहता यांनी व्यवहार करून तो विकत घेतला.
हे ही वाचा:
धनत्रयोदशी: दिवाळी खरेदीच्या उत्साहाचा दिवस!
‘वसुली कांड प्रकरणातील ही तर प्याद्याची अटक’
आदित्यजी बघा, करंज्यात १०० हून अधिक खारफुटीची झाली कत्तल!
आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मालमत्तेवर टाच
दक्षिण मुंबईतील नरिमन पॉइंट येथे हा फ्लॅट असून तो १०.६२ कोटींचा आहे. हा फ्लॅट अनमित्रा प्रॉपर्टिज या शेल कंपनीने मेहता यांना अवघ्या ५.३३ कोटींना विकल्याचे म्हटले जाते.
पालिकेचे आयुक्त असताना मेहता यांच्या प्रयत्नामुळे महाकाली गुंफेजवळच्या ३० फूट रस्त्याच्या विकासकामाचे हक्क अविनाश भोसले यांना मिळाले होते.