तब्बल सात वर्षांनी अजिंक्य देव यांच्या घरातील मोलकरीण निर्दोष

 तब्बल सात वर्षांनी अजिंक्य देव यांच्या घरातील मोलकरीण निर्दोष

प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीला अखेर तब्बल सात वर्षांनी निर्दोष सोडण्यात आले आहे. २०१४मध्ये तिच्यावर चोरीचा आरोप ठेवण्यात आला होता, पण तो आरोप सिद्ध होऊ न शकल्याने आणि तिच्याविरोधात कोणतेही पुरावे नसल्याने त्या मोलकरणीला निर्दोष सोडण्यात आले आहे.

१९ सप्टेंबर २०१४मध्ये ही घटना घडली होती. त्यावेळी अजिंक्य देव यांच्या घरी ही मोलकरीण कल्पना गवारी कामासाठी आली. दीड वाजता ती काम करून निघून गेली तेव्हा अजिंक्य देव यांची पत्नी आरती देव यांना कळले की त्यांच्या पर्समधील ३ हजार रुपये नाहीत. रात्री ८ वाजता ती पुन्हा ती मोलकरीण घरी काम करून निघाली. तेव्हाही आरती देव यांच्या पर्समधील २ हजार रु. चोरले गेल्याचे दिसले. तिने साडेसात लाखांचे दागिने घेतल्याचाही आरोप होता. तशी तक्रार मोलकरणीविरोधात दाखल करण्यात आली होती. यात एकमेव साक्षीदार होत्या त्या अजिंक्य देव यांच्या पत्नी आरती देव.

हे ही वाचा:

ज्येष्ठ अभिनेत्री सुनिता शिरोळेंना हवी आहे मदत

नीरज चोप्राचे नाव आता दिले जाणार ‘या’ संस्थेला

रेल्वे प्रवासासाठी तिकीट नापास, फक्त ‘पास’

परमबीर सिंग यांना चांदिवाल समितीने ठोठावला दंड

या संपूर्ण प्रकरणात आरती देव या केवळ एकाच साक्षीदाराचा जबाब नोंदविण्यात आला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, आपण चोरीची घटना बघितलेली नाही आणि तसे आपल्याला काही आठवतही नाही. त्यामुळे या प्रकरणात आणखी कोर्टकचेऱ्या करण्याची आपली इच्छा नाही. साक्षीदारानेच माघार घेतल्यामुळे आरोपीविरोधात कोणताही पुरावा शिल्लक राहिला नाही. त्यामुळे शेवटी मोलकरणीला निर्दोष मुक्त करण्याशिवाय न्यायालयापुढे पर्याय शिल्लक राहिला नाही. ३८१ या कलमांतर्गत मोलकरणीविरोधात तक्रार करण्यात आली होती पण त्यातून ती मोलकरीण निर्दोष मुक्त झाली.

Exit mobile version