पनामा पेपर लीक प्रकरणी अभिनेत्री ऐश्वर्या राय- बच्चन हिला ईडीकडून समन्स देण्यात आले होते. समन्स देऊन ऐश्वर्याला आता दिल्लीत बोलावण्यात आले होते. ‘एएनआय’ने दिलेल्या माहितीनुसार ऐश्वर्या राय ईडीच्या दिल्ली कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिली आहे. ऐश्वर्या हिची चौकशी सुरू आहे.
बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही दिल्लीतील ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहिली असून गेल्या तीन तासांपासून तिची चौकशी करण्यात येत आहे. काही कागदपत्रांची पडताळणीदेखील करण्यात येत आहे.
हे ही वाचा:
मतदार ओळखपत्राला नवा ‘आधार’! लोकसभेत विधेयक मंजूर
जानेवारीत होणार आयपीएल मेगा लिलाव?
‘सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसताहेत’
पाकिस्तानी बोटीतून जप्त केले ४०० कोटींचे हेरॉइन
यूकेमध्ये पनामा- आधारित लॉ फर्मचे २०१६ मध्ये ११.५ कोटी कागदपत्रे लीक झाले होते. त्यानंतर या प्रकरणात जगभरातील बडे नेते, उद्योगपती आणि प्रसिद्ध व्यक्तींची नावे समोर आली होती. त्यात बच्चन कुटुंबाच्या नावाचाही समावेश आहे. कंपनीच्या कागदपत्रांनुसार अमिताभ बच्चन हे १९९३ ते १९९७ या कालावधीत चार परदेशी कंपन्यांचे संचालक होते. या कंपन्यांचे भांडवल ५ ते ५० हजार डॉलर्स दाखविण्यात आले होते. मात्र, आपला या कंपन्यांशी संबंध नसून परदेशात खर्च केलेल्या पैशांवरील सर्व कर भरलेला आहे, असे अमिताभ बच्चन यांनी स्पष्ट केले होते.
या चार कंपन्यांपैकी तीन बहामासमध्ये, तर एक व्हर्जिन आयलँडमध्ये होती. ऐश्वर्याला एका कंपनीची संचालिका बनवण्यात आले होते. नंतर तिला कंपनीची शेअर होल्डर म्हणून घोषित करण्यात आले. त्यामुळे ऐश्वर्या राय हिचेही नाव समोर आले.