एअर इंडियाच्या महिला वैमानिकाची आत्महत्या

मित्राला झाली अटक

एअर इंडियाच्या महिला वैमानिकाची आत्महत्या

A fabric low poly suicide rope with slipknot placed on the white concrete wall with white space on left. 3D illustration and rendered by program Blender.

एअर इंडिया कंपनीच्या २५ वर्षीय महिला वैमानिकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी पवई येथे समोर आली आहे. या प्रकरणी पवई पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिच्या मित्राला बुधवारी अटक केली आहे.

सृष्टी तुली असे आत्महत्या केलेल्या महिला वैमानिकाचे नाव आहे. मित्राच्या मानसिक छळाला कंटाळून तिने हे पाऊल उचल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करून मित्र आदित्य पंडित याला अटक केली आहे.

हे ही वाचा :

व्यवसायाबाबत बोला; काश्मीर मुद्द्यावर बोलण्यासाठी आलेलो नाही!

अजमेर दर्गा हिंदू मंदिर असल्याचा दावा!

वाँटेड माओवादी कमांडर छोटू खरवार झारखंडमध्ये चकमकीत ठार!

मविआकडून १४ कोटी मतदारांचा अपमान!

सृष्टी तुली सोमवारी पहाटे अंधेरी (पूर्व) येथील मरोळ पोलिस कॅम्पच्या मागे भाड्याच्या घरात मृतावस्थेत आढळून आली. प्राथमिक चौकशीत पंडितच्या छळामुळे ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती, असे पोलिसांनी सांगितले.

पंडित पायलटच्या परीक्षेची तयारी करत होते, पण ते पात्र ठरू शकले नाहीत. तुली रविवारी काम आटोपून घरी परतली असता, पंडित याच्याशी वारंवार उशिरा येण्या-जाण्यावरून तिचा वाद झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

पहाटे एकच्या सुमारास पंडित दिल्लीला रवाना झाले. तुलीने त्याला फोनवर कॉल केला आणि ती टोकाचे पाऊल उचलणार असल्याचा कथित खुलासा केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडित नंतर तिच्या घरी परतला पण दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. त्याने एका चावी बनविणाऱ्याला कॉल केला. खोली उघडली आणि मृत अवस्थेत आढळून आली, मित्र पंडित यांने तिला तातडीने मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात नेले, तेथे तुलीला मृत घोषित करण्यात आले. तिच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

पवई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांनी सांगितले की, तुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून त्यांनी पंडितला भारतीय न्याय संहिता कलम १०८ (आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे) अंतर्गत अटक केली. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, असे निरीक्षकाने सांगितले.

“पोस्टमॉर्टम अहवालात मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. आम्ही लॉक केलेला महिलेचा फोन फॉरेन्सिक लॅबमध्ये आरोपींसोबत झालेल्या संभाषणांचे विश्लेषण करण्यासाठी पाठवला आहे. आम्ही लवकरच तिच्या कुटुंबातील सदस्य, जवळचे मित्र, सहकारी आणि रूममेट यांचे जबाब नोंदवू,” सोनवणे पुढे म्हणाले.

Exit mobile version