नोएडामध्ये एअर इंडिया कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या!

भरदिवसा हल्लेखोरांकडून ९ राऊंड फायर

नोएडामध्ये एअर इंडिया कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या!

नोएडामध्ये शुक्रवारी भरदिवसा रस्त्यावर झालेल्या हत्येने एकच खळबळ उडाली.सेक्टर १०४ मध्ये एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.दुचारकीवरून आलेल्या पाच हल्लेखोरांनी के श्री मॉलच्या बाहेर ९ राऊंड फायर करत तरुणाची हत्या करून पळ काढला.सुरज भान(३२) असे मृताचे नाव असून तो लोटस बुलेवर्ड सोसायटीत राहत होता.

सुरज भान एअर इंडियामध्ये क्रू मेंबर होता.सुरज मूळचा दिल्लीचा असून त्याला चार वर्षांची मुलगी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरज भान श्री प्लाझा येथील एनीटाइम फिटनेस जिममधून वर्कआऊट करून बाहेर पडला.त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभी केलेल्या कारमध्ये बसून तो केळी खात होता.त्यानंतर अचानक दोन दुचाकीवरून पाच अज्ञात हल्लेखोर तेथे आले आणि हल्लेखोरांनी सुरज भान यांच्यावर जवळून गोळीबार सुरु केला. सुरज भान याच्यावर गोळ्या झाडून हल्लेखोर हाजीपूर अंडरपासच्या दिशेने पळून गेले.सुरज भानाच्या डोक्यात गोळी लागली असून हल्लेखोरांनी एकूण नऊ राऊंड फायर केल्याचे सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा:

इस्रायलमध्ये बांधकाम विभागाकरिता भारतीय कामगारांची भरती मोहीम हरियाणात सुरु!

मलाही माझ्या लहानपणी अशा घरात रहायला मिळायला हवं होतं, पंतप्रधान झाले भावूक!

देशातील सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाचे पंतप्रधान मोदींकडून लोकार्पण; कसा आहे प्रकल्प?

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश म्हणाला, ‘माझा रामलल्ला विराजमान झाला’!

तरुणाच्या हत्येबाबत माहिती देताना सेक्टर ३९ क्षेत्रांतर्गत पोलीस स्टेशनचे डीसीपी हरीश चंदर म्हणाले की, जिममधून बाहेर पडल्यावर एका व्यक्तीवर गोळी झाडल्याची माहिती मिळाली.गाडीत बसलेल्या तरुणावर हल्ला करण्यात आला.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तरुणाला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला.मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी चार पथके तयार करून शोध सुरु असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

मॉलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोळी करत आहेत.या घटनेमागे पैशाची देवाणघेवाण किंवा प्रेमप्रकरण अशी करणे असावीत, असा पोलिसांचा संशय आहे.पोलिसांनी सर्व बाजुंनी तपास सुरु केला आहे.

Exit mobile version