पैंजण चोरण्यासाठी चोरट्याने महिलेचा पायच कापला

पैंजण चोरण्यासाठी चोरट्याने महिलेचा पायच कापला

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरी करण्यासाठी कोण काय करेल काही सांगता येत नाही. पायातले पैंजण चोरण्यासाठी आलेल्या चोरट्याने महिलेचा पायच कापण्याची घटना घडली आहे. ही महिला १०० वर्षांची वयोवृद्ध आहे . नुसती चोरीच नाही तर या चोरट्याने महिलेला मारहाणही केली आणि वृद्ध महिलेचे पाय धारदार शस्त्राने कापले. या विचित्र प्रकारच्या चोरीच्या घटनेमुळे एकच खळबळ माजली होती.

जमुनादेवी असं पीडित महिलेचं नाव आहे . चोरट्याने महिलेच्या अंगावरील दागिनेही खेचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पायातील पैंजण काढून देण्यासाठी सांगितले. परंतु तिने विरोध करताच पैंजण घातलेला पाय कापून ते पैंजण चोरून नेले. ही घटना भल्या पहाटे झाली, त्यावेळी घरातील सर्वजण झोपलेले हेते. चोरट्यांनी या महिलेला घराबाहेर खेचून नेत तिला धमकावले व मारहाण केली.

पोलिसांनी हे शस्त्र जप्त केले आहे. पोलिसांचे पथक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे, तर पीडितेच्या कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टरांचे पथक त्याच्यावर सतत लक्ष ठेवून आहे. एएसपी गाल्टा पीएस यांनी सांगितले की, गुन्ह्यात वापरलेल्या शस्त्रासोबतच पायांचे कापलेले भागही जप्त करण्यात आले आहेत. वृद्ध महिलेवर उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा:

निवडणूक आयोगाविरुद्ध ठाकरे गटाची दिल्ली उच्च न्यायालयात धाव

शिंदे गट ‘या’ तीन चिन्हांचा पर्याय निवडणूक आयोगासमोर ठेवणार

ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंविरोधात गुन्हा दाखल

चिन्हं, नाव गोठवल्यावरही ठाकरेंचे गद्दार, खोकासूर, मिंधे गट सुरूच

जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे प्रकृती गंभीर

पीडित महिलेची मुलगी गंगा देवी हिने फोनवर सांगितले की, मला माझ्या मुलीचा फोन आला होता की आजी एका नाल्याजवळ तिच्या पायांचे तुकडे झालेल्या स्थितीत जखमी पडली आहे. माहिती मिळताच आजूबाजूच्या लोकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. पाय कापल्यानंतर वृद्ध महिलेला खूप रक्तस्त्राव झाला, त्यामुळे तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे .

 

कापलेले पाय आणि हत्यार जप्त

घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक सक्रिय झाले. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तपासादरम्यान, जयपूर पोलिसांनी वृद्ध महिलेच्या कापलेल्या पायासह गुन्ह्यात वापरलेले धारदार शस्त्र जप्त केले आहे. मात्र, अद्यापपर्यंत आरोपीची ओळख पटलेली नाही आणि त्याला अटकही झालेली नाही. महिलेच्या घराजवळ ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडितेच्या मानेवर अनेक ठिकाणी जखमेच्या खुणाही आढळून आल्या आहेत. सध्या पोलीस पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.

Exit mobile version