कुत्रीचे नाव नुरी ठेवल्यामुळे राहुल गांधींविरोधात एआयएमआयएम न्यायालयात

भावना दुखावल्याचा आरोप

कुत्रीचे नाव नुरी ठेवल्यामुळे राहुल गांधींविरोधात एआयएमआयएम न्यायालयात

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी त्यांची आई सोनिया गांधी यांना जॅक रसेल टेरियर जातीची महागडी कुत्री भेट केली होती. या कुत्रीचे नाव त्यांनी नुरी असे ठेवले. यावरून एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी संताप व्यक्त केला होता. आता या प्रकरणी ओवैसींचा कार्यकर्ता मोहम्मद फरहान राहुल गांधींच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.

 

जागतिक वन्यजीव दिवसाच्या निमित्ताने ४ ऑक्टोबर रोजी राहुल गांधींनी त्यांच्या आई सोनिया गांधी यांना खास गोव्याहून आणलेले जॅक रसेल टेरियर जातीचे कुत्र्याचे पिल्लू भेट म्हणून दिले होते. ‘नूरी…कुटुंबातील नवीन सदस्य’ अशा कॅप्शनसह त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या कुत्रीचे नाव ‘नूरी’ ठेवल्यावरून सध्या वाद सुरू झाला आहे.

 

एमआयएम पक्षाने या मुद्द्यावरून तीव्र आक्षेप घेतल्यानंतर आता त्याविरोधात थेट न्यायालयात धाव घेतली आहे. “राहुल गांधींचं हे कृत्य निषेधार्ह व लाजिरवाणं आहे. कुत्रीला नूरी नाव देऊन गांधी परिवाराने मुस्लीम समाजातील मुलींचा अवमान केला आहे. तसेच, मुस्लीम मुली आणि मुस्लीम समाजाबाबत गांधी परिवाराची नकारात्मकताही दिसून येते” अशी टीका एमआयएमचे उत्तर प्रदेशातील नेते मोहम्मद फरहान यांनी केली आहे.

हे ही वाचा:

थरूर केरळात रिमझिमले पण, महाराष्ट्रात ठाकरे का सुखावले?

पाकिस्तानकडून जम्मू सीमेवरील विक्रम चौकीवर गोळीबार; दोन जवान जखमी

पाकिस्तानमधील एअर लाईन्स डबघाईला; २४ उड्डाण रद्द

ड्रग्स प्रकरणी सर्व आरोपी गजाआड; ललित पाटील १५ वा आरोपी

“नुरी नावाचा कुराणमध्येही उल्लेख असल्याचे फरान यांनी म्हंटले आहे. आम्ही राहुल गांधींविरोधात या कृत्यासाठी गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली आहे. राहुल गांधींच्या यूट्यूब आणिफेसबुकवरून आम्हाला ही माहिती मिळाली,” अशी प्रतिक्रिया फरहान मोहम्मद यांनी दिली.

Exit mobile version