27 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामालव्ह जिहादच्या घटनेने हादरले नेवासा...दलित कुटुंबातील अल्पवयीन मुलीचे अपहरण

लव्ह जिहादच्या घटनेने हादरले नेवासा…दलित कुटुंबातील अल्पवयीन मुलीचे अपहरण

Google News Follow

Related

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातून समोर आलेल्या लव्ह जिहादच्या घटनेमुळे सारा जिल्हा हादरून गेला आहे. चांदा येथे राहणाऱ्या एका दलित अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा आरोप तिच्या घरच्यांनी केला आहे. या महिन्यात नगर जिल्ह्यातून हे लव्ह जिहादचे दुसरे प्रकरण समोर आले आहे. या आधी श्रीरामपूर इथून लव्ह जिहादची घटना समोर आली होती. या दोन्ही प्रकरणात दलित कुटुंबातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचे आरोप आहेत.

सुरज लतीफ शेख नावाच्या तरुणाने आपल्या मुलीला फुस लावून पळवल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. सुरजच्या कुटुंबियांकडून त्याला मदत करण्यात आली असल्याचेही तक्रारीत म्हटले गेले आहे. तर आपल्या मुलीला पळवून तिची विक्री करण्यात आल्याची भीती कुटुंबियांना वाटत आहे.

नेहा आढाव असे बेपत्ता झालेल्या मुलीचे नाव आहे. १४ ऑगस्ट रोजी नेहा तिच्या राहत्या घरातून बेपत्ता झाली. संध्याकाळी सहा-साडे सहाच्या सुमारास नेहा घरात नसल्याचे तिच्या कुटुंबियांच्या लक्षात आले. त्यांनी नेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण नेहा सापडली नाही. अखेर त्यांनी सोनाई पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. बेपत्ता होताना नेहाने तिच्या घरून सत्तर ते ऐंशी हजार रुपये आणि तीन तोळे सोन्याचे दागिने सोबत नेले आहेत.

हे ही वाचा:

पॅरालिम्पिकमधील एका मराठमोळ्या ‘योद्ध्या’ची कहाणी

काबुल विमानतळावर पुन्हा होऊ शकतो दहशतवादी हल्ला

अफगाणिस्तानात बँका बंद; सर्वसामान्यांकडे पैशांचा खडखडाट

अनिल देशमुखांना क्लिन चीट दिलेलीच नाही!

लतीफ शेख नामक इसमाच्या मुलाकडून नेहाचे अपहरण करण्यात आल्याचा संशय नेहाच्या कुटुंबीयांनी वर्तवला आहे. या बाबत त्यांनी लतीफ शेख ह्यांच्याकडे विचारणा करण्याचा आणि नेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस लतीफ शेख यांनी आपल्यासोबत वाद घातल्याचे नेहाच्या कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे. तर लतीफ शेखने ‘मी पोलीस स्टेशन मॅनेज केले आहे’ अशा गमजा मारल्या. लतीफ हेख आणि त्याची तीन मुले आपल्या मुलीसोबत गैर कृत्य करू शकतो अशी भीती नेहाच्या कुटुंबियांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आज या घटनेला १५ दिवस उलटून गेल्यानंतरही या मुलीचा शोध अजून लागलेला नाही.

पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप
सदर प्रकरणाची तक्रार नगर जिल्ह्यातील सोनाई पोलीस स्थानकात करण्यात अली आहे. पण पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप केला जात आहे. पिडीत कुटुंब सुरज शेख या इसमाचे नाव संशयित म्हणून खात्रीलायक सांगत असतानाही पोलीस त्याचे नाव तक्रारीत नमूद करत नसल्याची माहिती समजते. पोलिसांनी अज्ञात इसमाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तर या प्रकरणात पोलीसांवर सरकारी दबाव आहे का? असा सवालही विचारला जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा