23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामावडील आणि भावाचे प्राण घेणाऱ्यांना फाशीच व्हायला हवी!

वडील आणि भावाचे प्राण घेणाऱ्यांना फाशीच व्हायला हवी!

Google News Follow

Related

अहमदाबाद बॉम्बस्फोटात वाचलेल्या यश व्यासचे उद्गार

अहमदाबाद स्फोटासाठी कारणीभूत असलेल्या ३८ जणांना सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्या घटनेत जखमी झालेल्या आणि आज हयात असलेल्यांना त्या भयंकर आठवणी पुन्हा एकदा सतावू लागल्या. यश व्यास हा असाच एक दुर्दैवी तरुण. तेव्हा तो अवघा ८ वर्षांचा होता. त्या बॉम्बस्फोटात त्याचे भाऊ आणि वडील मृत्युमुखी पडले. ऑपइंडियाने यश व्यासची ही दर्दभरी कहाणी सांगितली आहे.

दुष्यंत व्यास हे अहमदाबाद येथील रुग्णालयात कर्करोग विभागात काम करत होते. २६ जुलै २००८ला ८ वर्षांचा यश व्यास, त्याचा १०-११ वर्षांचा भाऊ रोहन आणि दुष्यंत मुलांना सायकल शिकविण्यासाठी बाहेर पडले. संध्याकाळी ७.३०च्या सुमारास त्यांना कुणीतरी रुग्णालयाजवळ यायला सांगितले. यशला आज ते नीटसे आठवत नाही. त्यानुसार त्याचे वडील त्या हॉस्पिटलजवळ गेले. १० मिनिटांनी तिथे एक रुग्णवाहिका आली. यशच्या वडिलांनी दोघा भावांना सायकलसह तिथेच उभे राहायला सांगितले आणि ते रुग्णवाहिकेकडे गेले. तेवढ्यात भयंकर स्फोट झाला. तो त्या रुग्णवाहिकेत झाला की तिथून जाणाऱ्या अन्य एखाद्या वाहनात हे यशला आज आठवत नाही. पण त्याच्या भावाचे शरीर पूर्णपणे जळून गेले. यशलाही भयंकर जखमा झाल्या. यश तसाच जखमी अवस्थेत धावत सुटला. त्याला तसे धावताना पाहून लोकांनी त्याला थांबवले आणि रुग्णालयात दाखल केले.

यश म्हणतो की, मी त्या दिवशी रात्री ८.३० वाजता माझ्या वडिलांना अखेरचे पाहिले. त्यांना स्ट्रेचरवरून नेण्यात येत होते. त्यानंतर यश बेशुद्ध झाला. दुष्यंत व्यास यांच्या पायाला गंभीर जखमा झाल्या होत्या. अतिरक्तस्रावामुळे त्यांचा अखेर मृत्यू झाला.

यश म्हणाला की, प्रारंभी मला एका सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर नरेंद्र मोदी यांनी उत्तम उपचार मला मिळावेत यासाठी आदेश दिले. जगातील कुठल्याही रुग्णालयात जिथे माझ्यावर चांगले उपचार होतील, तिथे दाखल करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मला नंतर अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन महिने मी अतिदक्षता विभागात होतो नंतर एक महिना जनरल वॉर्डमध्ये मला ठेवण्यात आले. डॉ. श्रीकांत लागवणकर, डॉ. ज्योतिंद्र कौर यांनी माझी खूप काळजी घेतली. माझ्या या उपचारांवर सरकारने १.६२ कोटी रुपये खर्च केला. सरकारी मदतही आम्हाला मिळाली.

यश आता बीएससी करत आहे आणि मास्टर्स डिग्री घेण्याची त्याची इच्छा आहे. तो म्हणतो की, या स्फोटातील दोषींनी फाशीचीच शिक्षा व्हायला हवी. त्यांनी निष्पाप लोकांना मारले आहे. त्यांना अजिबात क्षमा देता कामा नये. जन्मठेपेची शिक्षा त्यांना मिळता कामा नये.

हे ही वाचा:

… म्हणून विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटर अकाऊंट केलं डिऍक्टिव्हेट

देशाचे लक्ष एलआयसी आयपीओकडे…

सोमय्यांमुळे दमछाक; आता नारायण राणे

मिशन श्रीलंकासाठी भारतीय संघ जाहीर! कसोटी संघाचे नेतृत्वही रोहित शर्माकडे

 

आजही त्या घटनेच्या आठवणींनी त्याचा थरकाप उडतो. त्या स्फोटाच्या आवाजामुळे त्याच्या कानाला इजा पोहोचली आहे. आजही कधी कधी त्याला नीट ऐकू येत नाही. पण वैर मनात न ठेवता त्याने शिकून मोठे होण्याचा मार्ग पत्करला.

या शिक्षा झालेल्यांसाठी जमात उलेमा ए हिंद या संघटनेने लढा देण्याचे ठरविले आहे. सर्वोच्च न्यायालयापर्यंत आपण जाऊ असे या संघटनेने म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा