मोहम्मद झाला हर्षित चौधरी, बनावट लष्करी कार्ड, २४ महिलांना फसवले, वंदे भारतमध्ये केली होती चोरी !

पोलिसांकडून अधिक तपास सुरु

मोहम्मद झाला हर्षित चौधरी, बनावट लष्करी कार्ड, २४ महिलांना फसवले, वंदे भारतमध्ये केली होती चोरी !

३१ ऑगस्ट रोजी अहमदाबाद पोलिसांनी गुजरातमधील वंदे भारत ट्रेनमध्ये चोरीच्या प्रकरणात मोहम्मद शेहबाज नावाच्या एका व्यक्तीला अटक केली होती. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या मोहम्मद शेहबाज विषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी मोहम्मद शेहबाजने हिंदू नावाचा वापर करून २४ महिलांना फसवले आहे. आता तो एका ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातही अडकल्याचे समोर आले आहे. तसेच आरोपीने लष्करात असल्याचा बनाव करत बनावट आईडीही त्याच्याकडे सापडले. अलिगड पोलिसांनी या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून आता त्याला अहमदाबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

वंदे भारत ट्रेनमध्ये झालेल्या चोरीप्रकरणी आरोपी शाहबाजला अहमदाबाद पोलिसांनी ताब्यात घेतले होते. शहबाज हा उत्तर प्रदेशातील अलीगढचा रहिवासी आहे. हिंदू मुलींना फसवण्यासाठी आरोपी बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ‘मेजर हर्षित चौधरी’ नावाचा वापर करायचा. झारखंडमध्ये एका हिंदू मुलीला फसवल्याप्रकरणी त्याच्यावर अलीगडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा :

राजकोट पुतळा प्रकरण: जयदीप आपटेला २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

सरकारी फाईल्सवर सही करायची नाही! केजरीवालांना न्यायालयाचे आदेश

अरविंद केजरीवाल जामीनावर येणार तुरुंगातून बाहेर

आसाममध्ये जमावाचा पोलिसांवर हल्ला; दोघांना गोळ्या घातल्या!

आरोपी shaadi.com सारख्या विवाह संस्थांमार्फत बनावट नावाचा वापर करून हिंदू मुलींना जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करत असे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने बनावट हिंदू ओळखीचा वापर करून देशातील विविध भागातील २४ महिलांची फसवणूक केली होती. तो सोशल मीडिया साइट्स किंवा मॅट्रिमोनिअल साइट्सवर नोकरदार महिलांना भेटायचा आणि नंतर त्यांना शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत असे. त्यानंतर तो महिलांची आर्थिक लूट करत असे. पोलिसांनी त्याच्या बँक खात्यांची अधिक चौकशी केली असता, या खात्यातून नुकतेच मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचेही पोलिसांना आढळून आले. बँक खाती जप्त करण्यात आली असून आयटी अधिकाऱ्यांना कळवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version