एवढ्याशा कारणामुळे तिने त्या पुरुषाच्या कानाचा लचका तोडला…

पोलिसांकडून तपास सुरु

एवढ्याशा कारणामुळे तिने त्या पुरुषाच्या कानाचा लचका तोडला…

उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. भाड्याच्या घरात राहणाऱ्या शेजाऱ्यांमधील वाद इतका वाढला की हाणामारीपर्यंत पोहचला.एवढेच नाहीतर तर ती महिला नरभक्षक बनली.तिच्या पतीने त्या तरुणाला पकडले अन त्या महिलेने त्याच्या कानाचा चावा घेतला अन कानाचा काही भाग तोंडाने तोडला, विचित्र म्हणजे कानाचा तुटलेला भाग तिने गिळला.

कंपाउंडच्या गेटचे टाळे न लावल्याने हा वाद झाल्याचे बोलले जात आहे.वादानंतर पीडित तरुणाने कानाचा तुटलेला जो भाग होता तो त्या महिलेकडे परत मागितला, जेणेकरून शस्त्रक्रियेद्वारे तो भाग कानाला जोडता येईल, ज्यावर त्या महिलेने कानाचा तुकडा गिळून टाकला.अशा स्थितीत तरुण खूप अस्वस्थ आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

मनी लाँड्रिंग प्रकरणी छापा टाकत लालू यादव यांच्या निकटवर्तीयाला अटक!

शाहजहान शेखच्या अटकेनंतर आठ दिवसांनी संदेशखालीतील पोलिस ठाण्याच्या प्रभारीची बदली!

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल!

पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच रामनवमीला सुट्टी!

न्यू आग्रा पोलीस स्टेशन हद्दीतील नागला पाडी देवी नगर येथील ही घटना आहे.या ठिकाणी राहणारे रवींद्र यादव यांच्या भाडेकरूमध्ये हा वाद झाला.घडले असे की, पीडित भाडेकरू रामवीर बघेल याच्या मुलाचा पेपर असल्याने तो त्याला शाळेत सोडण्यासाठी सकाळी सहा वाजता घरातून बाहेर पडला.सकाळची वेळ असल्याने कंपाउंडच्या गेटला रामवीरने टाळे लावले नाही.यावरूनच हा वाद झाला.रामवीरच्या शेजारी राहणारे भाडेकरू संजीव व त्याच्या पत्नीने गेटला टाळे न लावल्यामुळे शिवीगाळ करायला सुरुवात केली.

शिवीगाळ केल्यानंतर आरोपी संजीवने पीडित रामवीर बघेलचा हात पकडला आणि त्याच्या पत्नीने त्याच्या कानाचा चावा घेतला.महिलेने तोंडाने कानाचा काही भाग तोडला.या वादात घरात राहणारे इतर भाडेकरूही पुढे आले आणि वेगळा झालेला कानाचा भाग त्याला परत करण्यास सांगितले, जेणेकरून शस्त्रक्रिया करता येईल.मात्र, संजीवची पत्नी राखीने तो कानाचा भाग गिळला, असे पीडित रामवीर बघेल याने तक्रारीत नोंदवले आहे.या प्रकरणी सहाय्यक पोलिस आयुक्त अरीब अहमद यांनी सांगितले की,आरोपीविरुद्ध कलम ३२५ आणि ५०६ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Exit mobile version