25 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरक्राईमनामाविमानात सिगारेट पिणाऱ्या आणि दरवाजा उघडणाऱ्या प्रवाशाने घातला गोंधळ

विमानात सिगारेट पिणाऱ्या आणि दरवाजा उघडणाऱ्या प्रवाशाने घातला गोंधळ

विमानाचे दार उघडायचासुद्धा केला प्रयत्न म्हणून झाली अटक.

Google News Follow

Related

लंडन ते मुंबई या विमान प्रवासात एअर इंडियाच्या विमानात एका भारतीय अमेरिकन नागरिकाने विमानात धूम्रपान केले आणि इतर प्रवाशांसोबत गैरवर्तन केले असल्याची घटना घडली आहे. याशिवाय त्याने विमानाचा दरवाजा उघडायचा प्रयत्नपण केला. या व्यक्तीवर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३७ वर्षीय भारतीय अमेरिकन नागरिकावर मुंबईच्या सहारा पोलीस स्थानकांत फ्लाईट मधील शौचालयामध्ये धूम्रपान आणि इतर प्रवाशांबरोबर गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आयपीसी कलम ३३६, २२,२३ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी, फ्लाईटमध्ये धूम्रपान करण्यास मनाई असताना सुद्धा या व्यक्तीने शौचालयामध्ये गेला, तेव्हा अलार्म वाजला आम्ही सर्व कर्मचारी शौचालयाच्या दिशेने धावलो तेव्हा त्याच्या हातात सिगरेट असल्याचे आम्ही बघितले. त्याच्या हातातील सिगरेट तात्काळ काढून घेतल्यावर त्याने आरडाओरडा करायला सुरवात केली. कसे तरी त्याला पकडून सीटवर बसवले. तर काही वेळाने आरोपी रमाकांत हा फ्लाइटच्या दरवाजाजवळ गेला आणि त्याने तो उघडायचा प्रयत्न केला . त्याच्या या वागण्यामुळे इतर प्रवासी घाबरले होते.

इतर प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता आम्ही त्याचे हातपाय बांधले आणि त्याला जागेवर बसवले. तरीही तो शांत बसला नाही तेव्हा या व्यक्तीने स्वतःचे डोके आपटायचा प्रयन्त केला. नंतर फ्लाईट मध्ये कोणी डॉक्टर आहे का विचारले असता एक डॉक्टर व्यक्ती समोर आली. या नंतर त्यांनी आरोपीला तपासले असता आरोपीने डॉक्टरांना त्याच्या बॅगेमध्ये एक गोळी आहे असे सांगितले ती देण्यात यावी तेव्हा त्याची बॅग तपासली असता ई सिगारेट व्यतिरिक्त त्या बागेत काहीच सापडले नाही. असे एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

दाऊदचा मुलगा दुबईत पार्टीला आला होता?

राज्यातील शेतकऱ्यांना १२ तास वीज देणार

जेष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन

माधुरी दीक्षित यांच्या आईचे वृद्धापकाळाने निधन

विमान मुंबईला उतरल्यावर त्या व्यक्तीला सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पोलिसांनी त्याला ताब्यांत घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा मूळचा भारतीय असून तो अमेरिकन नागरिक आहे. त्याच्याकडे अमेरिकन पासपोर्ट मिळाला आहे. पोलिसांनी आरोपीने हे कृत्य करताना तो मद्यधुंद अवस्थेत होता कि मानसिक दृष्ट्या अस्वस्थ होता हे कळण्यासाठी त्याचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. असे संगितले आहे.

दहा मार्च २०२३ रोजीच्या एअर इंडिया फ्लाईट एआय १३० मधील एक प्रवासी शौचालयात धूम्रपान करताना आढळल्यामुळे तसेच वारंवार बेजबाबदारपणे आणि आक्रमक वागला. विमान मुंबईत आल्यावर त्याला सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात देण्यात आले. नियामकाला घटनेची रीतसर माहिती देण्यात आली आहे. सध्याच्या तपासात आम्ही सर्व सहकार्य करणार आहोत. एअर इंडिया प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही वर्तनासाठी शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबिले. असे एअर इंडिया यांनी आपल्या निवेदनात म्हंटले आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा