31 C
Mumbai
Thursday, November 14, 2024
घरक्राईमनामाकाश्मीर आणि अरुणाचल प्रदेशला भारतापासून वेगळे दाखवण्यासाठी रेटला अजेंडा

काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशला भारतापासून वेगळे दाखवण्यासाठी रेटला अजेंडा

‘न्यूजक्लिक’वर पोलिसांचा आरोप

Google News Follow

Related

अरुणाचल प्रदेश आणि काश्मीर हा भारताचा भाग नाहीत, हा अजेंटा रेटल्याचे पुरावे मिळाल्यानंतर ‘न्यूजक्लिक’चे संस्थापक संपादक प्रबीर पुरकायस्थ यांना अटक करण्यात आल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. प्रबीर पुरकायस्थ आणि अमेरिकी तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगपती नेविल रॉय सिंघम यांच्या दरम्यान ईमेलवर झालेल्या चर्चेचे पुरावे असल्याचे आरोप दिल्ली पोलिसांनी केले आहेत. काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश हे भाग विवादास्पद दाखवून भारताच्या नकाशात कशाप्रकारे फेरबदल केले जातील, अशी चर्चा त्यांच्यात झाली, असा दावा पोलिसांनी केला आहे.

‘प्रबीर पुरकायस्थ आणि अमित चक्रवर्ती यांना अशाप्रकारे वादग्रस्त नकाशा बनवण्यासाठी ११५ कोटींहून अधिक परदेशी निधी मिळाला होता. तसेच, ‘न्यूजक्लिक’ला अशा प्रकारे अवैध पद्धतीने सन २०१८पासून कोट्यवधी रुपयांचा निधी परदेशातून मिळाला आहे,’ असा आरोप पोलिसांनी केला आहे. तसेच, न्यूजक्लिकमधील शेअरधारक गौतम नवलखा यांनी प्रतिबंधित नक्षली संघटनेसोबत काम केले होते आणि आयएसआय एजंट गुलाम नबी फईसोबत राष्ट्रविरोधी कट केले होते, असाही आरोप त्यांनी केला आहे.

पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार, प्रबीर पुरकायस्थ यांना मिळालेला परदेशी निधी गौतम नवलखा आणि तिस्ता सेटलवाडसहित अन्य व्यक्तींना पाठवण्यात आला होता. या निधीचा गैरवापर सार्वजनिक जीवनात अडथळा आणणे, शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करण्यासाठीही केला गेला, असा आरोपही पोलिसांनी केला आहे.

सन २०१९मधील लोकसभा निवडणुकीत अडथळा आणण्याचा प्रयत्नही पुरकायस्थ यांनी केला, करोना साथीदरम्यान केंद्र सरकारच्या प्रयत्नांना बदनाम करण्यासाठी न्यूजक्लिकने खोटी गोष्टही रचली. ही खोटी गोष्ट पीपुल्स डिस्पॅच पोर्टलच्या माध्यमातून पसरवण्यात आली. या पोर्टलचा मालकी हक्क न्यूजक्लिककडे आहे. हे पोर्टल परदेशातून अवैध प्रकारे मिळालेल्या निधीतून चालवले जाईल, असाही आरोप पोलिसांनी केला आहे.

हे ही वाचा:

‘आप’चे खासदार संजय सिंग यांना ईडीकडून अटक

चीनच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी लवकरच हवाई दल आणखी सुसज्ज

‘डीन’ला स्वच्छतागृह साफ करायला लावण्याप्रकरणी खासदार हेमंत पाटलांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा

इटलीमध्ये पर्यटकांची बस उलटून २१ ठार

दिल्ली पोलिसांनी प्रबीर पुरकायस्थ आणि अमित चक्रवर्ती यांच्या १५ दिवसांच्या रिमांडची मागणी केली आहे. पोलिसांना त्यांची सुमारे चार लाख ईमेलबाबत चौकशी करायची आहे. हे ईमेल पोलिसांना त्यांनी जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून मिळाले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा