उत्तर प्रदेश येथील गोरखपूरमधील गोरखनाथ मंदिर परिसरात रविवार, ३ एप्रिल रोजी सुरक्षा रक्षकांवर हल्ला करणाऱ्या मुर्तजा अब्बासी याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्या बाबतीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांना आणि एटीएसला मिळालेल्या पुराव्यांमधून त्याने केलेला हल्ला हा दहशतवादी कटाचा भाग असू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, अहमद मुर्तझा अब्बासी हा दहशतवादी संघटना आयएसशी संबंधित असण्याची शक्यता आहे. पोलिसांना मुर्ताझा याच्या लॅपटॉपमधून आयएस आणि सिरियासंबंधी काही व्हिडीओ मिळाले आहेत. तसेच या मंदिरावर हल्ला करण्यापूर्वी मुर्तझा हा नेपाळला जाऊन आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्याच्याकडून मंदिराचा नकाशा देखील मिळाला आहे. सध्या तपास यंत्रणांकडून याबाबत चौकशी सुरु आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी एटीएस आणि एसटीएफ मुंबईला पाठवण्यात आली आहे. मुंबईत मुर्तझाच्या संपर्कातील लोकांची चौकशी केली जाणार आहे.
हे ही वाचा:
करौली हिंसाचारप्रकरणी ४६ जणांना अटक; कर्फ्यू ७ एप्रिलपर्यंत वाढवला
तब्बल चार तास मुलांना घेऊन शाळेची बस गायब!
केमिकल इंजीनियर अब्बासीने केला गोरखपूर मठाच्या सुरक्षा जवानांवर हल्ला
दोनच दिवसांत मुंबईची मेट्रो तीनवेळा बंद पडली
मुर्तझा हा मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे त्याच्या घरच्यांकडून सांगण्यात आले होते. मात्र, समोर आलेल्या पुराव्यांनंतर या माहितीवर देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. राज्याचे गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव अवनीश कुमार अवस्थी यांनी या घटनेत दहशतवादी कनेक्शन असल्याच्या शक्यतेला नाकारू शकत नसल्याचे म्हटले आहे. तसेच गोरखनाथ मंदिरावर हल्ला ही घटना गंभीर कटाचा भाग असू शकतो. यासंदर्भातील पुरावे मिळाल्यानंतर याला दहशतवादी हल्ला म्हणू शकतो. हल्लेखोर मंदिरात घुसला असता तर मोठी घटना घडली असती, असे अवस्थी म्हणाले.