25 C
Mumbai
Thursday, November 14, 2024
घरक्राईमनामाबलात्कारानंतर तेलंगणात आदिवासींचा संताप, मुस्लिमांची घरे, दुकाने पेटविली

बलात्कारानंतर तेलंगणात आदिवासींचा संताप, मुस्लिमांची घरे, दुकाने पेटविली

आसिफाबाद जिल्ह्यातील जैनूर शहरातील घटना

Google News Follow

Related

तेलंगणामध्ये एका आदिवासी महिलेवर शेख मखधूम नावाच्या रिक्षा चालकाने बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. ही घटना समोर येताच आदिवासी संघटनांनी एकत्र येत या घटनेचा निषेध केला आहे. याला पुढे हिंसक वळण लागले असून आदिवासी महिलेवर केलेल्या अत्याचाराच्या घटनेचा बदला घेण्यासाठी दोन हजार संतप्त आदिवासींच्या गटाने मुस्लिमांची घरे, दुकाने आणि प्रतिष्ठान यावर हल्ला केला.

देवुगुडा गावातील गोंड समाजातील ४५ वर्षीय महिलेवर मखधूमने अत्याचार प्रयत्न केल्याची घटना ३१ ऑगस्ट रोजी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑगस्ट रोजी ही महिला रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळून आल्याची घटना घडली. सुरुवातीला ही घटना हिट एंड रन म्हणून नोंदवण्यात आली होती. १ सप्टेंबर रोजी महिलेच्या लहान भावाने तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. २ सप्टेंबर रोजी महिलेला शुद्ध आली आणि तिने पोलिसांना आपला त्रास सांगितला. महिलेने सांगितले की, ती कामानिमित्त जैनूरहून आईच्या गावी जात होती. त्यांनी जैनूर येथून एक ऑटो केली जो शेख मखधूम चालवत होता. त्यानंतर ही घटना घडली. आरोपीला ३ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. पण, ४ सप्टेंबर रोजी जातीय तणाव वाढला जेव्हा मखधूमने केलेल्या घृणास्पद गुन्ह्याच्या निषेधार्थ विविध आदिवासी संघटनांनी पुकारलेल्या बंदचा भाग म्हणून जैनूरमध्ये सुमारे पाच हजार लोक जमले.

आसिफाबाद जिल्ह्यातील जैनूर शहरात जमलेल्या आदिवासी लोकांनी मुस्लिमांची घरे, दुकाने आणि प्रतिष्ठान यावर हल्ला करत जाळपोळ केली. आदिवासींच्या हल्ल्यानंतर मुस्लीमही आपली प्रतिष्ठाने वाचवण्याचा प्रयत्न करताना रस्त्यावर दिसले. दरम्यान, अफवा आणि चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून या भागात इंटरनेट बंदी लागू केली आहे.

हे ही वाचा:

मुंबई पोलिसांनी काढली ड्रग्स माफियांची वरात, टोळीच्या चार सदस्यांना अटक !

बहराइचमधील लांडग्यांना पकडण्यासाठी ‘टेडी बिअर’चे जाळे !

सिंगापूरमध्ये पंतप्रधान मोदींनी लुटला ढोल वाजवण्याचा आनंद!

रामगिरी महाराजांना ‘सर तन से जुदा’ची धमकी देणाऱ्या मुहम्मद सादला ठोकल्या बेड्या

भाजपाचे प्रवक्ते तुल्ला वीरेंद्र गौड यांनी हल्ल्यानंतरचे व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, “आसिफाबाद जिल्ह्यातील जैनूरमध्ये एका रिक्षा चालकाने आदिवासी महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप केल्यानंतर अशांतता पसरली आहे. काँग्रेसच्या राजवटीत, आदिवासी महिलेवर झालेला क्रूर हल्ला, त्यानंतर झालेला हिंसाचार कायदा आणि सुव्यवस्थेचा ऱ्हास दर्शवतो. आमच्या आदिवासींचे रक्षण करण्यात काँग्रेस वारंवार अपयशी ठरली आहे आणि त्यांच्या ढिलाईमुळे असे गंभीर गुन्हे घडत आहेत.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा