महादेव ऑनलाइन बेटिंग अँप प्रकरणी रणबीरनंतर कपिल शर्मा, हुमा कुरेशीही टार्गेटवर

ईडीने मनी लॉंडरिंगचा गुन्हा दाखल केला आहे

महादेव ऑनलाइन बेटिंग अँप प्रकरणी रणबीरनंतर कपिल शर्मा, हुमा कुरेशीही टार्गेटवर

महादेव ऑनलाइन बेटिंग अँप प्रकरणात ईडीने रणबीर कपूर पाठोपाठ आणखी तीन बॉलिवूड सेलिब्रेटीना समन्स पाठवले आहे. या प्रकरणात ईडीच्या रडारवर आणखी १५ ते १६ बडे सेलिब्रेटी असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान ईडीने रणबीर कपूरला शुक्रवारी ईडीच्या कार्यालयात हजर व्हायचे होते मात्र रणबीरने दोन आठवड्यांचा वेळ ईडीकडून मागून घेतला आहे. कपिल शर्मा, हिना खान आणि हुमा कुरेशी असे ईडीने गुरुवारी समन्स बजावलेल्या बॉलिवूड सेलिब्रेटीची नावे आहेत.

 

 

महादेव ऑनलाइन बेटिंग अँप प्रकरणात ईडीने मनी लॉंडरिंगचा गुन्हा दाखल केला आहे. ईडीने याप्रकरणी बुधवारी बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरला समन्स बजावून शुक्रवारी ईडी कार्यालयात चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आले होते. ईडीने रणबीर कपूरवर महादेव बेटिंग अँपची ऑनलाइन जाहिरात करण्यासाठी पैसे मिळवल्याचा आरोप केला आहे. अधिका-यांनी सांगितले की, ईडीने कपूर यांना ६ ऑक्टोबर रोजी ईडीच्या रायपूर कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते, मात्र रणबीरने आपल्या वकिलामार्फत ईडीकडे अर्ज करून त्याला दोन आठवड्यांचा वेळ देण्यात यावा असे म्हटले आहे.

 

दरम्यान ईडीने दाखल केलेल्या मनी लाँडरिंग प्रकरणात इतर १४ ते १५ बॉलिवूड सेलिब्रिटींचा सहभाग असून ईडीला आढळून आला असून या अनुषंगाने ईडीने गुरुवारी कॉमेडी किंग कपिल शर्मा सह हिना खान हुमा कुरेशी या तिघांना समन्स बजावले आहे. ईडीच्या रडारवर बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी असून एकेक करून त्यांना देखील समन्स पाठवण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले.

हे ही वाचा:

महाराष्ट्रात झालेल्या मद्य दिलासा घोटाळ्याचे काय?

सप्तपदीशिवाय हिंदू विवाह वैध नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल लोकसभेतून निलंबित

लेझर लाईटनंतर डीजेच्या आवाजामुळे पोलिसांना कानाचा त्रास

ईडीच्या म्हणण्यानुसार महादेव अँप कंपनीचे प्रवर्तक सौरभ चंद्रशेखर आणि रवी उप्पल हे ऍप दुबईतून चालवत होते. त्यांनी ‘नवीन वापरकर्त्यांची नोंदणी करण्यासाठी, आयडी तयार करण्यासाठी आणि बहुस्तरीय बेनामी बँक खात्यांच्या नेटवर्कद्वारे पैसे काढण्यासाठी ऑनलाइन बेटिंग ऍप्लिकेशन्सचा वापर केल्याचा आरोप आहे. अधिका-यांनी सांगितले की, ईडीच्या तपासात ‘महादेव ऑनलाइन बेटिंग ऍप’ संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथील मुख्य कार्यालयातून चालवले जात असल्याचे समोर आले आहे.सट्टेबाजीतून कमावलेले पैसे इतर देशांतील खात्यांमध्ये पाठवण्यासाठी ‘हवाला’चा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Exit mobile version