31 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरक्राईमनामायूपीएससी नापास, तरीही परराष्ट्र सेवेत असल्याचा बनाव... ज्योती मिश्राची चक्रावून टाकणारी कहाणी

यूपीएससी नापास, तरीही परराष्ट्र सेवेत असल्याचा बनाव… ज्योती मिश्राची चक्रावून टाकणारी कहाणी

पूजा खेडकर प्रकरणानंतर नवे प्रकरण चर्चेत

Google News Follow

Related

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण सध्या महाराष्ट्रात गाजत आहे, एवढेच नव्हे तर देशपातळीवरही त्याची चर्चा सुरू आहे. अशातच ज्योती मिश्रा नावाच्या तरुणीचे प्रकरण चर्चेत आले आहे. परराष्ट्र सेवेत असल्याचा बनाव करणाऱ्या आणि सध्या स्पेनमध्ये नियुक्तीवर असल्याची बतावणी करणाऱ्या या तरुणीच्या कहाणीने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

तिच्याबद्दल अशी माहिती समोर आली की, अनुसूचित जातीच्या जागेवर ती यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाली. प्रत्यक्षात ती खुल्या गटातून येते. ही बाब उघड झाल्यानंतर तिने ट्विट करत आपले स्पष्टीकरण दिले होते. हे ज्योती नाव असलेली यूपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची यादी व्हायरल होत असून त्यातील ही ज्योती नावाची तरुणी आयएएस आहे आणि ती हरयाणाची आहे. पण ही ज्योती मिश्रा म्हणते की ती दुसरी यादी आहे. मी आयएएस नाही तर आयएफएस (भारतीय परराष्ट्र सेवा) म्हणून निवडले गेले आहे.

त्यानंतर ज्योती मिश्राबाबत माहिती समोर येते की, ती रायबरेलीची आहे आणि ती परराष्ट्र सेवेत असून प्रोबेशनवर ती स्पेनची राजधानी माद्रिद येथे सचिवपदावर काम करत आहे. पण ज्योती मिश्राने हे सांगितल्यानंतर खरी माहिती समोर आली. सध्या ज्योती मिश्रा ही दिल्लीत राहात असून तिथे निमसरकारी कार्यालयात ती काम करत आहे. आपण माद्रिद, स्पेनला राहात असल्याचे ती तिथूनच सांगत असे.

यासंदर्भात तिच्या वडिलांशी संपर्क साधला तेव्हा मुलगी स्पेनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर ज्योती मिश्राशी संपर्क साधण्याचा प्रयत्न टाइम्स ऑफ इंडियाच्या प्रतिनिधीने केला. तेव्हा तिने आपले खोटे पासपोर्ट, यूपीएससीने केलेली निवड, माद्रिदमधील पोस्टिंगसाठी मिळालेले पत्र, लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीत जिथे तिने प्रशिक्षण घेतले होते त्या संस्थेचे ओळखपत्र सादर केले. तेव्हा टाइम्स ऑफ इंडियाने माद्रिदमधील भारतीय दुतावासाला संपर्क साधला. तेथील भारतीय अधिकारी अमन चंद्रा यांनी सांगितले की, अशा नावाची कुणीही अधिकारी येथे कार्यरत नाही. तेव्हा ज्योती मिश्राचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न झाल्यावर ती दिल्लीत राहात असल्याचे समोर आले. त्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाने तिला संपर्क केल्यावर तिने सगळा बनाव उघड केला.

हे ही वाचा:

उत्तर प्रदेशात मोठा रेल्वे अपघात; दिब्रूगड एक्स्प्रेसचे १० डबे घसरले

जगातील लोकसंख्येला मुस्लिम जबाबदार, भारतातही तीच परिस्थिती !

बिहारमध्ये चार आठवड्यांत १५ वा पूल कोसळला!

सुरतमध्ये ड्रग्जच्या कारखान्यावर छापा, २० कोटींचा कच्चा माल जप्त !

ज्योती मिश्राने सांगितले की, मी कधीही यूपीएससी परीक्षा उत्तीर्णच झालेली नाही. तिने आपल्या वडिलांना आपण उत्तीर्ण झाल्याचे खोटेच सांगितले आणि तसे खोटे कागद तिने वडील सुरेश मिश्रा यांना दिले. त्यात ज्योती मिश्राचा रोल नंबर ५९०४३१७ असा आहे. पण खऱ्या यादीत ज्योती नावाच्या तरुणीचा नंबर ८४३९१० असा आहे. ज्योती मिश्राने आपल्या आईवडिलांना हे खोटे सांगितल्यानंतर त्यांचाही आपल्या मुलीवर विश्वास होता. त्याचा फायदा तिने उचलला. शिक्षणात ती उत्तम असल्यामुळे वडिलांनाही संशय आला नाही. ती आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी नियमित जात नसे.

२०२२मध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी ज्योती मिश्राला यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या. कारण सुरेश मिश्रा हे पोलिस सेवेत होते. त्यामुळे आपल्या एका सहकाऱ्याची मुलगी यूपीएससी उत्तीर्ण झाली याचा आनंद त्यांनाही झाला होता. तिला अनेक कार्यक्रमात बोलावून सन्मानितही केले गेले. जेव्हा सुरेश मिश्रा यांना हा सगळा बनाव कळला तेव्हा त्यांना धक्का बसला. आम्ही कधीही तिच्यावर यूपीएससी उत्तीर्ण होण्यासाठी दबाव टाकला नव्हता. आता ती कुठे आहे हे आम्हाला माहीत नाही पण तिने घरी यावे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
197,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा