उत्तर प्रदेशच्या बहराइचमध्ये इस्लामिक कट्टरवाद्यांनी बहराइचमधील दुर्गा विसर्जन यात्रेवर हल्ला केला होता. त्याचवेळी २२ वर्षीय तरुण राम गोपाल मिश्राची इस्लामिक कट्टरवाद्यांनी हत्या केली होती. यामुळे या भागात मोठा हिंसाचार उसळला होता. जाळपोळीच्या घटना देखील घडल्या होत्या. या हिंसाचारानंतर बुलडोझरच्या मदतीने बेकायदा बांधकाम हटवण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे पीडब्ल्यूडीने मुख्य आरोपी अब्दुलच्या घरासह सुमारे २३ घरांवर नोटीस चिकटवल्या आहेत. नोटीसमध्ये बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
या नोटीसनंतर दुकाने रिकामी करून दुकानदारांनी स्वतः दुकानांचे बेकायदा बांधकाम पाडण्यास सुरुवात केली आहे. बुलडोझरची कारवाई टाळण्यासाठी आणि बांधकाम पाडल्यानंतर प्रशासनाला देय देणे टाळण्यासाठी हे काम केले जात आहे. बहराइच हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ३१ जणांना अटक करून तुरुंगात पाठवले आहे. बेकायदा बांधकामे पाडण्यासाठी लवकरच बुलडोझरची कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रस्त्यांवर अतिक्रमण करून केलेल्या बांधकामांवर विभागाने नोटीस चिकटवल्या आहेत. रस्त्याच्या मधोमध ६० फूट अंतरावर बांधलेले बांधकाम तीन दिवसांत हटवण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
संबंधित बांधकाम जिल्हादंडाधिकारी बहराइच यांच्या परवानगीने किंवा पूर्व विभागीय परवानगीने केले असल्यास त्याची मूळ प्रत तात्काळ उपलब्ध करून द्या किंवा तीन दिवसांच्या आत सदरील अवैध बांधकाम स्वतः काढून टाका, असे नोटीसद्वारे कळविण्यात आले आहे. अन्यथा पोलीस आणि प्रशासनाच्या मदतीने बेकायदा बांधकाम हटविण्याची कारवाई करण्यात येईल. यामध्ये झालेला खर्च तुमच्याकडून महसुलातून वसूल केला जाईल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा..
जम्मू- काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्तावाला नायब राज्यपालांची मंजुरी
एक धमकीचा संदेश आणि विमान कंपन्यांना करोडोंचे नुकसान
अभिनेत्री शामनाथच्या घरात आढळले अंमली पदार्थ
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; जिरीबाम जिल्ह्यातील गावात बॉम्बस्फोट
रविवारी, १३ ऑक्टोबर रोजी इस्लामिक कट्टरवाद्यांनी बहराइचमधील दुर्गा विसर्जन यात्रेवर हल्ला केला होता. त्याचवेळी २२ वर्षीय तरुण राम गोपाल मिश्राची इस्लामिक कट्टरवाद्यांनी हत्या केली होती. राम गोपाल मिश्रा यांचा शवविच्छेदन अहवाल बुधवार, १६ ऑक्टोबर रोजी समोर आला. माहितीनुसार, राम गोपाल मिश्रा याची हत्या करण्यापूर्वी त्याला विजेचा धक्का देण्यात आला, त्याच्या पायाची नखे काढण्यात आली, त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले आणि त्याच्या शरीरात ३५ हून अधिक गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.