पश्चिम बंगालमध्ये ट्रेन उलटवण्याचा कट, रुळावर टाकला ‘लोखंडी पत्रा’

पोलिसांकडून तिघांना अटक 

पश्चिम बंगालमध्ये ट्रेन उलटवण्याचा कट, रुळावर टाकला ‘लोखंडी पत्रा’

सध्या देशात ट्रेन रुळावरून उलटवण्याच्या कटाच्या अनेक घटना समोर येत आहेत. घरगुती सिलेंडरची टाकी, सिमेंटचे ब्लॉक, अशा अनेक प्रकारच्या साधनांचा वापर करून ट्रेन उलटवण्याचा कट काही लोक करत आहेत. या सर्व घटना ताज्या असताना पश्चिम बंगालमध्ये रेल्वे रुळावर लोखंडी पत्रा टाकल्याची बातमी समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मलबाजार परिसरातून तीन गुन्हेगारांना अटक केली आहे.

सिलीगुडी ते अलीपुरद्वारला जोडणाऱ्या रेल्वे मार्गावरील सेवक आणि उदलबाडी स्थानकांदरम्यान मंगपोजवळ रेल्वे ट्रॅकवर लोखंडी पत्रा ठेवण्यात आल्याची माहिती आहे. यावेळी लोको पायलटला रेल्वे रुळावर एक लोखंडी पत्रा दिसला. त्याचवेळी लोको पायलटने ट्रेन थांबवली आणि तातडीने आरपीएफला घटनेची माहिती दिली.  यानंतर पोलिसांनी तपास सुरु करून तिघांना अटक केली आहे. दरम्यान, लोको पायलटच्या खबरदारीमुळे कोणतीही दुर्घटना झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून अशी माहिती मिळाली की, हे आरोपी रेल्वे परिसरात चोरी करत असत. चोरी केलेल्या वस्तू रेल्वे रुळावर ठेवत असत, रेल्वे त्या वस्तूवरून गेल्यास त्याचे तुकडे होत, त्यामुळे चोरांना ते घेवून जाने सोयीस्कर होत. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

हे ही वाचा : 

राज्यघटनेबाबत जागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी

ज्ञानेश महारावांवर गुन्हा दाखल करा

तो ज्यूस मध्ये मिसळत होता ‘मानवी मूत्र’

केजारीवालांना उपरती, देणार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा !

Exit mobile version