गुरुवार, २८ एप्रिल रोजी धुळ्यात पोलिसांनी तलवारींचा मोठा साठा जप्त केला होता. त्यानंतर आज धुळे, पुण्यानंतर आता नांदेडमध्ये पोलिसांनी तलवारींचा मोठा साठा जप्त केला आहे. अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे आमदार राम कदम यांनी शुक्रवारी सांगितले आहे. महाराष्ट्रात या तलवारी काँग्रेसशासित राजस्थान या राज्यातुन आल्या आहेत. महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा कट आहे, असे कदम म्हणाले आहेत.
कदम म्हणाले की, नांदेडपूर्वी पुण्यात तलवारी सापडल्या होता. धुळ्यात ९०० तलवारींचा साठा पकडला आहे. या तलवारी राजस्थानातून येत होत्या. काँग्रेसशासित राज्यांतूनच तलवारी का येतात? हा सुनियोजित कारस्थान असल्याचे दिसून येत आहे. तलवार पुरवठ्यामागे कोण आहेत हे जाणून घ्यायचे असल्याचे कदम म्हणाले.
आता नांदेड शहरात २५ तलवारीही सापडल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात तलवारी सापडल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक येत्या काळात या तलवारींद्वारे हिंसाचार पसरवण्याचा कट आखत होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. की त्याच्या मनात अजून काही चालू होते? सध्या महाराष्ट्र पोलीस या सर्व प्रकरणाचा तपास करत आहेत.
हे ही वाचा:
कीर्तनकार प्रकरणी नागरिकांच्या रोषानंतर पोलिसांचा माफीनामा
मुंबईकरांची एसी लाईफलाईन झाली स्वस्त
ठाकरे सरकार विरोधात किरीट सोमय्या न्यायालयात
आतापर्यंत पोलीसांनी केलेल्या कारवाईत पुणे, धुळे, नांदेडमधून अश्या अनेक ठिकाणाहून अनेक तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, राज्यात दहशद पसरवण्यासाठी अनेक वेळा काही राज्यांत तलवारी नाचवल्याचे प्रकार समोर आले आहेत. पुण्यात असे अनेक प्रकार समोर आले असून पोलिसांनी त्यावर कारवाई केली आहे.