तब्बल १४ वर्षांनंतर त्याच्या शिक्षेत केली वाढ! काय घडले वाचा…

तब्बल १४ वर्षांनंतर त्याच्या शिक्षेत केली वाढ!  काय घडले वाचा…

छिल्लरच्या मते कोविड-१९ काळात महिलांवरील अत्याचारात वाढ.

गुन्हा घडल्यानंतर न्यायाची प्रतीक्षा ही आपल्याला नवीन नाही. परंतु एक नाही तर तब्बल १४ वर्षांपूर्वी झालेल्या गुन्ह्यासाठी आता न्याय मिळालेला आहे.

मुंबईतील कफ परेड येथील सायोनारा इमारतीत सुमारे १४ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेत बहिणीवर सहा गोळ्या झाडणाऱ्या भावाच्या शिक्षेत मुंबई उच्च न्यायालयाने अखेर वाढ करण्याचा निर्णय सोमवारी देऊन, त्याला दहा वर्षांच्या सक्तमजुरीची व एक लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. त्यामुळे बहिणीला अखेर न्याय मिळाला आहे. ललित तिमोती डिसूझा (४२) असे या भावाचे नाव आहे.

ललित याने २८ ऑक्टोबर २००७च्या पहाटे मैत्रिण निताशासोबत घरी आला. निताशाने लॉर्नाच्या पार्किंगच्या जागेवर तिची कार थोड्या वेळासाठी उभी केली होती. त्यानंतर लॉर्ना परत आल्यानंतर, तिने वॉचमन राजकिशोरकडे विचारणा केली आणि ती कार हटवण्यास ललितला कळवण्यास सांगितले. ललित पार्किंगच्या ठिकाणी आल्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाले. त्यानंतर ललितने खिशातील पिस्तुल काढून लॉर्नावर सहा गोळ्या झाडल्या. त्यामुळे खाली कोसळलेल्या लॉर्नाने लहान बहिणीला फोन करून बोलावले आणि ती बॉम्बे रुग्णालयात दाखल झाली. अनेक दिवसांच्या उपचारांअंती ती बरी झाली.

ललितला शिक्षा भोगण्याच्या दृष्टीने संबंधित न्यायालयासमोर स्वत:हून शरण येण्यासाठी उच्च न्यायालयाने चार आठवड्यांची मुदत दिली आहे. या अटीचे त्याने पालन केले नाही, तर संबंधित न्यायालयाने त्याच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढून त्याला तुरुंगात पाठवण्याची कार्यवाही करावी, असेही न्या. प्रसन्ना वराळे व न्या. नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने आपल्या आदेशात स्पष्ट केले.

हे ही वाचा:

जान मोहम्मद हे केवळ प्यादे; मुख्य सूत्रधार मुंबईत

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा समर्पण पर्व

हत्यारांची पूजा करून ‘कुलपं’ तोडणारी टोळी जेरबंद

जावेद अख्तर, तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही!

२८ ऑक्टोबर २००७च्या पहाटे तीनच्या सुमारास घडलेल्या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी, मुंबई सत्र न्यायालयाने ललित याला १ फेब्रुवारी २०१२ रोजी भारतीय दंडसंहितेच्या कलम ३२६ अन्वये दोषी ठरवून तीन वर्षांची सक्तमजुरी व एक लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली होती. तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांची शिक्षा दिली होती. कलम ३०७खालील (हत्येचा प्रयत्न) गुन्ह्यातून त्या न्यायालयाने त्याची मुक्तता केली होती. त्यामुळे राज्य सरकारने सरकारी वकील गीता मुळेकर यांच्यामार्फत, तर पीडित बहीण लॉर्ना तिमोती डिसूझा (४६) यांनी अॅड. नारायण कुमार यांच्यामार्फत सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात अपिल केले होते. ललित यानेही अॅड. राहुल आरोटे यांच्यामार्फत शिक्षेविरोधात अपिल केले होते. या सर्व अपिलांवरील एकत्रित सुनावणीअंती, १६ ऑगस्ट रोजी राखून ठेवलेला निर्णय खंडपीठाने १३ सप्टेंबर रोजी जाहीर केला.

Exit mobile version