श्रद्धा वालकर या तरुणीला ठार मारून नंतर तिच्या शरीराचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताबचे कुटुंब पंधरा दिवसांपूर्वी वसईतील आपले घर सोडून मुंबईला आले होते, असे समोर आले आहे.
२८ वर्षीय आफताब हा श्रद्धासह दिल्लीत राहात होतो. ते दोघेही लिव्ह इनमध्ये राहात होते. पण तो सतत तिला मारहाण करत असे. त्यातूनच त्याने तिची गळा दाबून हत्या केली आणि नंतर तिच्या शरीराचे ३५ तुकडे करून त्याने वेगवेगळ्या ठिकाणी भिरकावून दिले. पण आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
यासंदर्भाने आफताब कुटुंबाच्या शेजाऱ्यांनी माहिती दिली की, नुकतीच आफताबने आपल्या कुटुंबाला भेट दिली होती तेव्हा तो सर्वसाधारण वाटला. याच वसईच्या घरात अनेकवेळा श्रद्धा आलेली होती आणि शेजारी तिला ओळखत होते. वसईच्या या इमारतीतील सोसायटीचे अध्यक्ष रामदास केवट यांनी सांगितले की, आफताबचे कुटुंब हे या इमारतीत २० वर्षे राहात होते. तो इथेच लहानाचा मोठा झाला. आफताबचे वडील हे मुंबईला कामाला होते. नंतर त्यांनी संपूर्ण कुटुंब मुंबईला हलविण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना सोसायटीतील लोकांनी विचारले, तेव्हा ते म्हणाले की, ते आणि त्यांचा लहान मुलगा मुंबईतच काम करत आहेत, त्यामुळे त्यांनी संपूर्ण कुटुंब मुंबईला हलविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची ही कृती सगळ्यांना योग्य वाटली.
हे ही वाचा:
समाजवादीचे नेते अबू आझमी आयकर विभागाच्या रडारवर
श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यापूर्वी ‘त्याने’ पाहिली Dexter वेब सीरिज
क्रोएशियातही आता मल्लखांब रोवला!
प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय असले पाहिजे
श्रद्धा आणि आफताब हे बम्बल या ऍपच्या माध्यमातून जवळ आले. एका कॉल सेंटरला दोघे काम करत होते. तिथेच त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले. पण श्रद्धाला घरातून विरोध होता. त्यामुळे ती आफताबबरोबर पळून गेली. दोघेही दिल्लीत राहू लागले. तिथे तिने आफताबला लग्नाविषयी विचारणा केली, तेव्हा त्यातून त्याने श्रद्धाचा गळा आवळून खून केला आणि नंतर तिच्या शरीराचे तुकडे केले.