श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावालाने हे मान्य केल्याचे कळते की, एका चिनी सुऱ्याच्या सहाय्याने त्याने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे केले. दिल्लीतील मेहरौली येथील आफताबच्या फ्लॅटमधून अनेक हत्यारे पोलिसांना मिळाल्याचे समोर येते आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आफताबने श्रद्धाची गळा दाबून हत्या केल्यानंतर तिचे हात प्रथम कापले. त्याच्या नुकत्याच झालेल्या नार्को चाचणीत त्याने ही कबुली दिल्याचे कळते आहे. त्याने हे हत्यार कुठे दडवून ठेवले ते त्याने या चाचणीदरम्यान सांगितल्याचे कळते. आता पोलिस हे हत्यार शोधण्याच्या प्रयत्नात आहेत.
आफताबने केलेल्या या निर्घृण हत्याकांडाची चर्चा सध्या देशभरात सुरू आहे. श्रद्धा आणि आफताब हे लिव्ह इन मध्ये राहात होते आणि नंतर त्यांच्यात वाद निर्माण झाले. आफताब हा नियमितपणे तिला मारहाण करत असे. शेवटी त्याने तिची गळा दाबून हत्या केली आणि नंतर तिच्या शरीराचे ३५ तुकडे करून ते विविध ठिकाणी विखुरले. प्रथम हे तुकडे त्याने ३०० लिटरच्या फ्रीजमध्ये ठेवले आणि हळूहळू त्यांची विल्हेवाट लावण्यास सुरुवात केली. मात्र सहा महिन्यांनी ही बाब स्पष्ट झाली.
हे ही वाचा:
कासवांबरोबर वेळास गावही ‘नॉट’ रिचेबल
मुल दत्तक देण्याच्या नावावर जोडप्याला लुबाडले
फ्रान्सिस झेवियर: गोव्यामधील ख्रिश्चन धर्मप्रसाराचा क्रूर चेहरा
अजितदादांनी काढली ठाकरेंच्या बातचलाखीची हवा…
दिल्लीतील रोहिणी येथे आफताबची नार्को टेस्ट घेण्यात आली आणि त्यातून पोलिसांच्या हाती आणखी काही धागेदोरे लागले आहेत. आता हे हत्यार त्याने कुठून विकत घेतले, केव्हा घेतले याचा शोध पोलिस घेत आहेत. त्याने ज्या दिवशी हत्या केली त्याआधीच त्याने ही हत्यारे घेतली हे स्पष्ट झाले तर त्याने हे सगळे पूर्वनियोजित पद्धतीने केले हे स्पष्ट होईल. १८ मे रोजी त्याने श्रद्धाची हत्या केली होती.
आफताब अमिन पूनावाला याला १२ नोव्हेंबरला अटक कऱण्यात आली आहे. त्याला पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्यानंतर आणखी पाच दिवसांनी ही कोठडी वाढविण्यात आली. आता २६ नोव्हेंबरला त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. १३ दिवसांसाठी तो त्या कोठडीत असेल.