मुंबई शहरासह उपनगरात अमली पदार्थ विक्री आणि तस्करीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पूर्व उपनगरातील चुनाभट्टी पोलिसांनी दोन अमली पदार्थ तस्करांना अटक केली आहे. त्यांच्याकडून जवळपास १० कोटी रुपये किमतीचा अफगाणी चरस हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
रहीम माजिद शेख आणि नितीन टंडेल अशी अटक करण्यात आलेल्या अमली पदार्थ तस्करांची नावे आहेत. हे दोघे मूळचे गुजरात राज्यातील वलसाड येथे राहणारे आहेत. मुंबईत अमली पदार्थाच्या तस्करीचे प्रमाण वाढले असून मुंबई पोलिसांनी ड्रग्स माफियावर लक्ष केंद्रीत केले आहे.
हे ही वाचा:
“प्रसिद्ध कृष्णा: आयपीएलमध्ये चमकते भविष्य!”
नॅशनल हेराल्ड प्रकरणातून पळ काढतेय काँग्रेस!
बांसुरी स्वराजच्या बॅगेवर ‘नॅशनल हेराल्डची लूट’; पोहोचल्या संसदेत
अनुराग कश्यपचा माफीनामा, म्हणाला रागाच्या भरात मर्यादा…
चुनाभटट्टी पोलीस ठाणेचे एटीसी पथक व परिमंडळ ६ विशेष पथक हे पोलीस ठाणे हददीत गस्त करत असताना एक इसम संशयित रित्या वावरताना आढळून आल्याने त्यास ताब्यात घेतलेल्या इसम नामे रहिम माजिद शेख वय ३० वर्षे रा.ठि. डुंगरी लिंक रोड , तहसिल वलसाड, गुजरात याच्या अंगझडती मधुन १ किलो ९०७ ग्रॅम वजनाचा चरस हा अंमलीपदार्थ किंमत अंदाजे १ कोटी ९० लाख रूपये हा मुंबई शहरात विक्री करण्याच्या उदद्देशाने मिळून आल्याने त्याचे विरूद्ध चुनाभटट्टी पोलीस ठाणे यांनी तक्रार दिल्याने चुनाभटट्टी पोलीस ठाणे गु.र.क्र.२१९/२०२५ कलम ८ (क), २० (बी) २ (सी) एनडीपीएस कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्हयाच्या अधिक तपासात पोलीस पथकाने गुजरात राज्यातील वलसाड याठिकाणा वरून तेथील स्थानिक पोलीसांच्या मदतीने इसम नामे नितीन शांतीलाल टंडेल वय ३२ वर्षे रा.ठि. नानीबागल, राधाकृष्ण मंदिाराजवळ, डुंगरी ता- वलसाड, राज्यः- गुजरात याच्या ताब्यातून विक्रीकरीता लपवुन ठेवलेला ८ किलो १४६ ग्रॅम वजनाचे अफगाणी चरस अंदाजे किंमत ८ कोटी १० लाख ४० हजार रूपये किमतीचा अंमलीपदार्थ जप्त केला. आजपावेतो एकुण १० किलो ५३ ग्रॅम चरस किंमत १० कोटी ५३ हजार रूपये जप्त करण्यात आलेला असून नमुद गुन्हयामध्ये २ आरोपीतास अटक करण्यात आलेली असून ते सध्या पोलीस कोठडी रिमांड मध्ये असून पुढील तपास चालु आहे.