गर्भपिशवीला टाके घालण्यासाठी आलेल्या महिला रुग्णाला दिल्या गर्भपाताच्या गोळ्या!

बुलढाणा जिल्ह्यातील घटना

गर्भपिशवीला टाके घालण्यासाठी आलेल्या महिला रुग्णाला दिल्या गर्भपाताच्या गोळ्या!

रुग्णालयातील डॉक्टर असो व कर्मचारी यांच्या चुकीच्या कारभारामुळे अनेक रुग्णांना फटका बसल्याच्या बातम्या नेहमी येत असतात.तसाच एक अजब प्रकार बुलढाण्यात घडला आहे.डॉक्टरांच्या एका चुकीमुळे महिला रुग्णाचा गर्भपात झाला आहे.या प्रकारानंतर पीडितेच्या संतप्त नातेवाईकांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना धारेवर धरत दोषी आरोग्य कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

बुलढाण्यात राहणाऱ्या सौ. विद्या वाघ या सहा महिन्याच्या गर्भवती होत्या. त्या आपल्या चेकअपसाठी बुलढाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या. त्यावेळी गर्भवती महिलेला जिल्हा स्त्री रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासलं. त्यावेळी डॉक्टरांच्या लक्षात आलं की, महिलेच्या गर्भ पिशवीचं मुख उघडलं असून ते मोठं झालं आहे. त्यामुळे गर्भारपणातील पुढच्या अडचणी टाळण्यासाठी डॉक्टरांनी गर्भ पिशवीला टाके देण्याची गरज असल्याचं सांगितलं. जर टाके घातले नाहीत, तर नैसर्गिक गर्भपाताचा धोका असल्याचंही डॉक्टरांनी गर्भवती महिला आणि तिच्या नातेवाईकांना सांगितलं.

हे ही वाचा:

जरांगे पाटील यांच्याविरोधात भुजबळांनी दंड थोपटले!

भारताविरुद्धचा पराभव लागला जिव्हारी; संपूर्ण श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त

‘अतिमागास वर्गाला कमी लेखण्यासाठी बिहारच्या जातीय सर्वेक्षणात फेरफार’!

जम्मू-काश्मीरमधील लष्करी तळावर हल्ला करणाऱ्या लश्करच्या कमांडरचा शिरच्छेद!

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, महिला गर्भ पिशवीला टाके देण्यासाठी रुग्णालयात दाखल झाली.मात्र, रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे पीडितेच्या गर्भ पिशवीला टाके देण्या ऐवजी गर्भपाताच्या गोळ्या दिल्या.त्यामुळे महिलेचा गर्भपात झाला आणि तिला आपल्या सहा महिन्याच्या बाळाला गमवावे लागले. रुग्णालयात महिलेवर गर्भपाताचे उपचार केल्यानेच तिचा गर्भपात होऊन बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप या महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.

या घटनेनंतर जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण याना पीडितेच्या नातेवाईकांनी धारेवर धरलं.याबाबत डॉ.सुभाष चव्हाण म्हणाल्या, हि खूप मोठी चुकी असून चौकशी करून प्रतिक्रिया देऊ असं माध्यमांसमोर सांगितलं.मात्र, रुग्णालयाच्या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभारामुळे एका महिलेला आपल्या सहा महिन्याच्या चिमुकल्याला गमवावे लागले आहे.

 

 

Exit mobile version