23 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरक्राईमनामाबॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे एनसीबीच्या रडारवर; आज होणार चौकशी

बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे एनसीबीच्या रडारवर; आज होणार चौकशी

Google News Follow

Related

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) अधिकारी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी आज (२१ ऑक्टोबर) पोहोचले. ड्रग्स प्रकरणाच्या चौकशीसाठीचे समन्स देण्यासाठी एनसीबीचे अधिकारी अनन्या पांडे हिच्या घरी पोहोचले होते. अधिकाऱ्यांनी अनन्या पांडेच्या घरी जाऊन तिला समन्स दिले आहेत. ज्या बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल आर्यन खानच्या व्हाॅट्सॲप चॅटमध्ये बोलले जात होते, ती अनन्या पांडे होती का, असा सवाल आता उपस्थित झाला आहे. सध्या एनसीबीने अनन्या पांडेला आज दुपारी २ वाजता ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी बोलावले आहे.

दरम्यान एक एनसीबीचे पथक अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर पोहचली असून तिथे सर्च ऑपरेशन सुरू आहे. आर्यन खान अटक प्रकरणानंतर एनसीबीने आपली कारवाई आणखी तीव्र केली आहे.

मुंबईच्या विशेष न्यायालयाने बुधवारी (२१ ऑक्टोबर) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला होता. आर्यन खानची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, आता या याचिकेवर सुनावणी मंगळवारी (२६ ऑक्टोबर) होणार असून अजून चार दिवस आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.

हे ही वाचा:

शाहरुख खान आर्यनच्या भेटीला!

मंगळवार पर्यंत आर्यन खान तुरुंगातच

लसीकरणाच्या ऐतिहासिक क्षणाला १०० वारसा स्थळांना चढणार तिरंग्याचा साज!

कौसा रुग्णालयाचा खर्च वाढता वाढता वाढे! २७ कोटींवरून १४७ कोटी

क्रूझवरील पार्टी प्रकरणात एनसीबीने आर्यन खानला अटक केली होती. क्रूझवरील ड्रग्स पार्टी उधळत एनसीबीने आठ जणांना ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर त्यातील तीन जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. त्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेचा यांचा समावेश होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा