कायदेशीर अडचणीत सापडली आहे.अमिषा आणि तिच्या बिझनेस पार्टनरवर चित्रपट निर्मात्याची करोडो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. एका चित्रपट निर्मात्याने तिच्यावर २.५ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप केला आहे. अमिषावर भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० आणि १२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक न्यायालयाने तिला समन्सही बजावले आहे.
अजय कुमार सिंग नावाच्या चित्रपट निर्मात्याने अमीषा आणि तिचा व्यावसायिक भागीदार क्रुणाल यांच्यावर फसवणूक, धमकावणे आणि चेक बाऊन्सचा आरोप करून गुन्हा दाखल केला आहे. अमिषा आणि कृणालने ‘देसी मॅजिक’ नावाच्या चित्रपटाच्या निर्मिती आणि प्रमोशनसाठी आपल्याकडून अडीच कोटी रुपये घेतले होते. या दोघांनी चित्रपट पूर्ण झाल्यावर सर्व पैसे व्याजासह परत करण्याचे वचन दिले होते,पण तो चित्रपट प्रदर्शित झाला नाही असा दावा निर्मात्याने दावा केला आहे की, तक्रारीत केला आहे.
अमिषाकडे पैसे परत मागितले तेव्हा तिने स्पष्टपणे नकार दिला. अनेक महिन्यांच्या विलंबानंतर अखेर तिने ऑक्टोबर २०१८ मध्ये त्याला २.५ कोटी आणि ५० लाखांचे दोन धनादेश दिले, परंतु ते दोन्ही बाऊन्स झाले असेही सिंग याने म्हटले आहे. . रांचीच्या दिवाणी न्यायालयाने आता तिच्या आणि कृणालविरुद्ध वॉरंट जारी केले आहे.
हे ही वाचा:
कुनोतून पाळलेला ओबन चित्ता घरी परतला , आशाची मात्र अजूनही निराशा
१५५ देशांतील नद्यांच्या पाण्याने करणार रामललाचा जलाभिषेक
७१ हजार तरुणांना मिळणार सरकारी नोकऱ्या
नरेंद्र मोदींवर विश्वास व्यक्त करत आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण कुमार भाजपात
अमिषा लवकरच सनी देओलसह ‘गदर २’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट त्यांच्या २००१ च्या ब्लॉकबस्टर ‘गदर’चा सिक्वेल आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित, ‘गदर’ हा १९४७ मधील भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीच्या आसपासच्या कालखंडावर आधारित आहे. सध्या हा चित्रपट बनत आहे.