सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचे प्रकरण प्रचंड गाजले होते. अद्याप त्यासंदर्भात कोणतेही सत्य बाहेर आलेले नाही. पण त्याची आठवण अद्यापही चित्रपट क्षेत्रात आवर्जून काढली जाते. याच सुशांत राजपूतच्या एका मैत्रिणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
टीव्ही इंडस्ट्रीत एक वाईट घटना घडली आहे . ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘ससुराल सिमर का’मध्ये काम केलेली अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने आत्महत्या केली आहे. प्राथमिक माहितीनुसार त्याने गळफास लावून आत्महत्या केली असल्याच म्हटल्या जात आहे. या बातमीने संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. वैशालीचे घर मध्य प्रदेशातील इंदूरमधील तेजाजी नगर पोलीस स्टेशन परिसरात होते. तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिच्या आत्महत्येमागचे कारण कळू शकलेले नाही. पोलिसांनी तिचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेम प्रकरणातून ही घटना घडली असावी असं म्हटले जात आहे. वैशाली ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची जवळची मैत्रीण होती. त्यामुळे या प्रकरणाकडे वेगळ्या दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे.
वैशालीने स्टार प्लस मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून तिच्या करिअरची सुरुवात केली. त्यात तिने संजनाची भूमिका साकारली होती. त्यातून ती घराघरात पोहोचली होती. वैशालीच्या मालिकांमध्ये ‘ये है आशिकी’, ‘ससुराल सिमर का’, ‘लाल इश्क’ आणि ‘विश और अमृत’ यांचा समावेश आहे. ‘ससुराल सिमर का’ मधील तिच्या पात्राचे नाव अंजली भारद्वाज होते. यासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नकारात्मक भूमिकेसाठी गोल्डन पेडल पुरस्कार मिळाला होता . २०१९ मध्ये तिने ‘मनमोहिनी’ या टीव्ही शोमध्ये काम केले होते.
वैशालीचे गेल्या वर्षी एप्रिलमध्ये केनियास्थित अभिनंदन सिंग हुंदलसोबत लग्न झाले होते. लॉकडाऊन दरम्यान दोघांची भेट मॅट्रिमोनिअल साइटवरून झाली होती. साखरपुड्याच्या सोहळ्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लोक कोरोनाशी झुंज देत असताना तिला कोणतेही सेलिब्रेशन करायचे नाही असे तिने म्हटले होते.
अभिनेता सुशांत सिंगची जवळची मैत्रीण
वैशाली दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची खूप चांगली मैत्रीण होती. सुशांतसोबतचा तिचा फोटो व्हायरल होत आहे, जो तिने सुशांतच्या मृत्यूंनंतर शेअर केला होता. पोस्टमध्ये वैशालीने लिहिले होते , ‘नाही, नाही, मी रडणे थांबवू शकत नाही, कोणीतरी मला सांगेल की हे एक स्वप्न आहे, सुशांत एक अद्भुत व्यक्ती आणि अभिनेता होता.