23.4 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामाजिया खान आत्महत्या प्रकरणी सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता

जिया खान आत्महत्या प्रकरणी सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता

सीबीआय न्यायालयाला ठोस पुरावा मिळाला नाही

Google News Follow

Related

अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणी तब्बल १० वर्षानंतर सीबीआय न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे या प्रकरणातील आरोपी सूरज पांचोलीची विशेष सीबीआय कोर्टाने ठोस पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. जियाची आई राबिया खान यांनी या प्रकरणी आणखी मुद्दे मांडण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागितला होता. मात्र न्यायालयाने राबिया खान यांचा हा अर्ज फेटाळत या प्रकरणावर निकाल दिला आहे. आता या निकालाला राबिया खान वरच्या न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी या प्रकरणी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर २० एप्रिल रोजी खटल्याचा निकाल राखून ठेवला होता. त्याच वेळी खटल्याचा निकाल २८ एप्रिल रोजी देण्याचेही स्पष्ट केले होते. अभिनेत्री जिया खान हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाप्रकरणी अभिनेता सूरज पांचोली याच्यावरील खटल्याचा विशेष सीबीआय न्यायालयात शुक्रवारी सुनावणी झाली.

दहा वर्षांपूर्वी काय झाले होते?
३ जून २०१३ रोजी जिया ही गळफास लावलेल्या अवस्थेत तिच्या मुंबईतील घरात आढळली होती. ७ जून रोजी जियाच्या खोलीतून तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेले सहा पानी पत्र आढळले होते. त्यात तिने सूरज पांचोलीसोबतच्या नात्याबाबत लिहिले होते. त्यात सूरज आपल्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार करत असल्याचे म्हटले होते. त्या आधारे पोलिसांनी सूरज याला आरोपी केले होते. तसेच, त्याच्यावर जिया हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. १ जुलै २०१३ रोजी उच्च न्यायालयाने सूरज याची जामिनावर सुटका केली. याच आरोपांतर्गत सूरज याच्यावर खटला चालवण्यात आला.

हे ही वाचा:

अलास्कामध्ये लष्कराची दोन हेलिकॉप्टर हवेत धडकली, तीन सैनिकांचा मृत्यू

शारजाच्या तुरुंगात क्रिसन परेराला केस धुण्यासाठी वापरावा लागला डिटर्जंट

आंतरजातीय विवाहाच्या विरोधातून पित्याने मुलीसह पत्नीवर काढला राग

‘द केरळ स्टोरी’ : हिंदू, ख्रिश्चन मुलींना दहशतवादी बनवण्याचा हृदयद्रावक प्रवास

जामिनावर सुटका
१ जुलै २०१३ रोजी उच्च न्यायालयाने सूरज याची जामिनावर सुटका केली. ५० हजार रुपये दंड आकारून त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला होता.

उच्च न्यायालयात धाव
सूरज याची जामिनावर सुटका झाल्यानंतर जिया हिची आई राबिया खान हिने उच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच, जिया हिने आत्महत्या केली नसून सूरज याने तिची हत्या केल्याचा आरोप केला. तसेच, प्रकरणाचा तपास एसआयटी किंवा सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली होती. २०१४मध्ये न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग केला. त्यानंतर मार्च २०१९मध्ये विशेष सीबीआय न्यायालयाने खटल्याच्या सुनावणीला सुरुवात केली.

२०१५मध्ये सूरजच्या घरावर छापा
सूरज पांचोलीचे वडील आदित्य पांचोली यांनी राबिया खान हिच्याविरोधात १०० कोटी रुपयांचा दावा ठोकला होता. १५ मे, २०१५ मे रोजी सीबीआयने त्याच्या घरावर छापाही मारला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा