25 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरक्राईमनामाअभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी; आता तारीखही दिली

अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी; आता तारीखही दिली

मुंबई पोलिसांनी सुरू केला तपास

Google News Follow

Related

अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यावेळी सलमानच्या हत्येची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, रविवारी कंट्रोल रूममध्ये एक कॉल आला होता, ज्यामध्ये राजस्थानच्या जोधपूरमध्ये राहणाऱ्या रॉकी भाईने ही धमकी दिली होती. रॉकीने अभिनेता सलमानला ३० एप्रिल रोजी जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.

आता मुंबई पोलीस सतर्क झाले असून या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. फोन ट्रॅक करून या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. याआधीही सलमानला राजस्थानमधून धमकीचे पत्र किंवा कॉल आले आहेत. सलमानला या आधी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने जीवे मारण्याची धमकी दिली होती. अशा धमक्या त्याने कॅमेऱ्यासमोरही अनेकदा दिल्या आहेत.सलमानने काळवीटाची शिकार केली होती त्यामुळे मी लहानपणापासूनच त्याचा तिरस्कार करतो असे बिश्नोईने सांगितले होते.

हे ही वाचा:

मोबाईल फोन काढून घेतला म्हणून केली आत्महत्या

राहुल गांधी आता ‘ट्रोल’ पुरते उरले!

सावरकर जयंती आता स्वातंत्र्यवीर गौरव दिन!

सर्वोच्च न्यायालयाने फटकारले, अग्निपथ योजना योग्यच!

सलमानला एकदा जीवे मारण्याची धमकी देणारा ई-मेलही आला होता. माझा बॉस गोल्डी भाईला (गोल्डी ब्रार) सलमानशी बोलायचे आहे, लवकरच त्याच्याशी संपर्क साधा, असे या धमकीत म्हटले होते. ‘यावेळी आम्ही माहिती देत ​​आहोत, पुढे सरळ ऍक्शन होईल’, असेही मेलमध्ये म्हटले होते. सलमान खानला येत असलेल्या धमक्यांनंतर त्याने खास बुलेटप्रूफ गाडीही विकत घेतली आहे. निसान पेट्रोल एसयूव्ही ही ती कार असून ती भारतीय बाजारपेठेत उपलब्ध नाही. मात्र परदेशातून ती सलमान खानसाठी विकत घेण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा