…म्हणून सलमान खानने घेतली पोलीस आयुक्तांची भेट!

…म्हणून सलमान खानने घेतली पोलीस आयुक्तांची भेट!

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने शुक्रवारी दुपारी मुंबई पोलीस आयुक्ताची सदिच्छा भेट घेतली, परंतु या भेटीमागे वेगळे कारण असल्याची चर्चा पोलीस आयुक्तलयात रंगली होती.

मुसेवाला प्रकरणानंतर लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या टार्गेटवर सलमान आणि त्याचे वडील सलीम खान असल्याचे त्यांना काही महिन्यांपूर्वी आलेल्या धमकीच्या चिठ्ठीतून समोर आले होते. गायक मुसेवाला याची मध्यंतरी काही गुंडांनी हत्या केली होती. त्या प्रकरणानंतर सलमान खानचेही नाव समोर आले होते. त्यातून खळबळ उडाली होती. सलामानने नवीन शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता. याच शस्त्र परवानासंदर्भात सलमान हा पोलीस आयुक्त मुख्यालयात आला होता.

अभिनेता सलमान खान हा शुक्रवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास क्रॉफर्ड मार्केट समोरील मुंबई पोलिस मुख्यालयात त्याच्या खाजगी वाहनातून आला होता. मुख्यालयात आल्यानंतर तो थेट पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या दालनाकडे गेला. पोलीस आयुक्त आणि सलमान यांच्यात काही वेळ चर्चा झाल्यानंतर सलमान याने सह पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेतली.

हे ही वाचा:

मस्तीत मित्राला दिला धक्का आणि…

“सडका कांदा बाजूला ठेवला तर बाकीचे कांदे वाचतील”

गद्दार कोण? राहुल शेवाळे यांनी दिले उत्तर

उमेश कोल्हे हत्येप्रकरणी आरोपींना न्यायालयीन कोठडी

 

सलमान खान याने अचानक पोलीस आयुक्तलयात येऊन पोलीस आयुक्त यांची भेट घेण्यामागचे नक्की कारण होते, त्यांच्यात काय चर्चा झाली याबाबत काही कळू शकले नसले तरी ही भेट केवळ सदिच्छा भेट असल्याची माहिती सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.

मे महिन्यान सलमान खान आणि सलीम खान या पितापुत्राला लॉरेन्स बिष्णोई टोळीने जीवे मारण्याची चिठ्ठी मार्फत धमकी दिली होती. या प्रकरणी सलीम खान यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली असून या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करीत आहे. सलमान खान याने शुक्रवारी आयुक्तांच्या भेटी मागे हे कारण असू शकते का? अशी चर्चा सुरू आहे.

Exit mobile version