लष्कर अधिकारी भासवून अभिनेते राकेश बेदी यांना फसवले

८५ हजार रुपयांची फसवणूक

लष्कर अधिकारी भासवून अभिनेते राकेश बेदी यांना फसवले

लष्करी अधिकारी असल्याचे भासवून एका सायबर चोराने चित्रपट आणि टीव्ही अभिनेते राकेश बेदी (वय ६९ वर्षे) यांची ८५ हजारांची फसवणूक केली आहे. राकेश बेदी यांनी पुण्यातील त्यांचे घर ८७ लाखांना विकण्याची जाहिरात दिली होती. हे घर खरेदी करण्यात या सायबर चोराने रस दाखवला होता. मात्र, नंतर या चोराने त्यांचे फोनकॉल घेणे बंद केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे बेदी यांच्या लक्षात आले. या आरोपीने त्याचे ओळखपत्र आणि अन्य कागदपत्रे दाखवून आपण भारतीय लष्करात असल्याचा दावा केला होता. ओशिवरा पोलिसांनी ३० डिसेंबर रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

या आरोपीने स्वतःचे नाव आदित्यकुमार संगितले होते. तसेच, त्याने बेदी यांचा संपर्क क्रमांक घर विक्री करणाऱ्या पोर्टलवरून घेतल्याचे सांगितले होते. ‘मी त्याच्यावर विश्वास ठेवला कारण मी माझी एक मालमत्ता लष्करातील एका अधिकाऱ्यालाच विकली होती आणि ते एक चांगले गृहस्थ होते. त्यामुळे मीही त्याच्यावर विश्वास ठेवला,’ असे राकेश बेदी यांनी सांगितले.

दुसऱ्या दिवशी आरोपीने बेदी यांना फोन करून त्याच्या वरिष्ठांना फ्लॅट आवडला असल्याचे सांगत तो विकत घेण्याची तयारी दर्शवली होती. तसेच, त्याच्या वरिष्ठांचे लष्करी खाते असून ते त्या माध्यमातूनच व्यवहार करतील, असेही त्यांनी सांगितले. त्यासाठी राकेश बेदी यांना एक खाते क्रमांक दिला. तसेच, त्यांना जीपेच्या माध्यमातून त्यातून एक रुपया देण्यास सांगितले. हा व्यवहार यशस्वी झाल्यानंतर बेदी यांना ५० हजार रुपये पाठवण्यास सांगितले. त्यांनी तसेही केले. नंतर आरोपीने आपण ५० हजार रुपये परत पाठवल्याचे सांगितले. मात्र, आपल्याला पैसे न मिळाल्याचे बेदी यांनी सांगितले.

हे ही वाचा:

मोदीच येणार! द गार्डीयनचाही दावा

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जपान भूकंपाच्या धक्क्याने हादरलं!

बाबरीचे पक्षकार अंसारी म्हणतात, पंतप्रधान मोदींनी अयोध्येचे रुपडे पालटले!

इस्रोकडून भारतीयांना नव्या वर्षाची भेट; XPoSAT चे यशस्वी प्रक्षेपण!

त्यानंतर चोराने सांगितले की, हे लष्कराचे खाते असून व्यवहार करताना दोन्ही पक्षांच्या खात्यांत सारखीच रोख रक्कम असणे आवश्यक आहे. बेदी यांना नंतर ५० हजार रुपये पाठवण्यास सांगण्यात आले. त्यांनी त्यांच्या बायकोच्या खात्यातून ते पाठवले. त्यानंतर बेदी यांनी आणखी दोन व्यवहार केले. त्यात त्यांनी २५ हजार आणि १० हजार रुपये पाठवले. मात्र, त्यानंतर आरोपीने त्यांच्या फोनकॉलना उत्तर देणे थांबवले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बेदी यांनी पोलिसात धाव घेतली.

Exit mobile version