अभिनेते किरण माने यांनी दाखल केला अब्रुनुकसानीचा दावा

अभिनेते किरण माने यांनी दाखल केला अब्रुनुकसानीचा दावा

‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील अभिनेते किरण माने यांची हकालपट्टी झाल्याचे प्रकरण महाराष्ट्रात चांगलेच गाजले होते या संपूर्ण प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट आला आहे किरण माने यांनी या प्रकरणात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे शुक्रवारी ४ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेत माने यांनी या विषयाची माहिती दिली आहे.

पत्रकार परिषेदेत ” पहिल्या दिवसापासून माझा मुद्दा हाच आहे की, मला मेल किंवा नोटीस का देण्यात आलेली नाही? अचानक एक हिंदी प्रोडक्शन हाऊस मला सांगते की, काढून टाकण्यात आले आहे. माझ्यावर आरोप करण्यात आला आहे की, महिलांबाबत गैरवर्तन केलं आहे. हे आरोप धादांत खोटे आहेत”, असे किरण माने म्हणाले.  आणि त्यांनी पाच कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत वकील असीम सरोदे देखील उपस्थित होते.

हे ही वाचा:

‘सीमा वादात अमेरिकेने भारताच्या बाजूने म्हणजे मोदी सरकारच्या कूटनीतीचे यश’

बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात

आयसिसच्या म्होरक्याचा खात्मा

सर्वोच्च न्यायालय म्हणते, मनी लॉन्ड्रिंगचा वापर दहशतीसाठीही केला जातो!

किरण माने यांच्या प्रकरणात महिलांच्या तक्रारी आहेत, असं सांगून करवाई झाली आहे. या प्रकरणामध्ये चॅनलने किरण माने यांच्यावर कारवाई करणे गरजेचं होतं, हे का केलं नाही. या प्रकरणी चॅनलने संबंधित तरुणींची तक्रार घेणं गरजेचं होतं आणि तत्काळ किरण माने यांना नोटीस द्यायला हवी होती. यापैकी कोणतीही बाब पाळली गेली नाही. त्यांनी जाणीवपूर्वक या बाबी केल्या आहेत आणि अतिशय वाईट पद्धतीन किरण माने यांना काढण्यात आलं आहे. त्यांची बदनामी केली. म्हणून पॅनोरमा प्रोडक्शन यांना 5 कोटी रुपयांची अब्रूनुकसानीची नोटीस पाठवण्यात येत आहे. शिवाय त्यांनी ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत त्याना सन्मानाने परत घ्यावं अणि लेखी माफीनामा सादर करावा, अन्यथा आम्ही कोर्टात जाणार आहोत’, असे वकील असिम सरोदे म्हणाले आहेत.

Exit mobile version