अभिनेता गोविंदाला स्वतःच्याच बंदुकीतून लागली गोळी

प्रकृती स्थिर असल्याची माहिती

अभिनेता गोविंदाला स्वतःच्याच बंदुकीतून लागली गोळी

बॉलीवूड अभिनेता गोविंदाच्या पायाला गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. स्वतःच्याच परवाना असलेल्या बंदुकीतून मिसफायर होऊन एक गोळी गोविंदाच्या पायाला लागली. मुंबई पोलिसांनी याबाद्दल माहिती दिली आहे.

अभिनेता गोविंदा हा मुंबईत पहाटे त्याच्या घरातून बाहेर निघत असताना त्याच्या हातातील बंदुकीतून मिसफायर झाली. मुंबईत पहाटे ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. गोविंदा घराबाहेर जात असताना त्याच्याकडे परवाना असलेली बंदुक तपासून पाहत होता. त्याचवेळी चुकून त्यातून गोळी झाडली गेली. ही गोळी गोविंदाच्या गुडघ्याला लागली. या घटनेनंतर त्याला तातडीने मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पायातून गोळी काढण्यात आली असून गोविंदाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. पोलिसांनी गोविंदाकडील बंदूक जप्त केली आहे.

गोविंदाचा मॅनेजर शशी याने ‘एएनआय’ला दिलेल्या माहितीनुसार, गोविंदा एका कामानिमित्त कोलकाताला जाण्यासाठी घरातून निघत होता. त्यावेळी तो नेहमीप्रमाणे परवाना असलेली बंदुक स्वतःसोबत घेत होता. ही बंदुक त्याच्या हातातून निसटली आणि त्यातून त्याच्या पायाला गोळी लागली. डॉक्टरांनी गोविंदाच्या पायातून गोळी काढली असून त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचंही शशीने सांगितलं आहे.

हे ही वाचा : 

धारावीतील मशिदीचे अनधिकृत बांधकाम काढण्यास सुरुवात!

कानपूरमध्ये पुन्हा ट्रेन उलटवण्याचा कट, रुळावर सापडला ‘अग्निसुरक्षा सिलेंडर’

सुनीता विल्यम्स यांचा पृथ्वीवर येण्याचा मार्ग मोकळा; नासाची टीम अंतराळात पोहोचली

इस्रायलने बेरूतमध्ये केलेल्या हल्ल्यात चार जण ठार

गोविंदाला गोळी लागताच चाहत्यांकडून काळजी व्यक्त करण्यात येत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी गोविंदाच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली आहे. बॉलिवूडमध्ये नाव कमावल्यानंतर गोविंदाने राजकारणात प्रवेश केला. २००४ मध्ये त्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. उत्तर मुंबई मतदारसंघातून त्याने राम नाईक विरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत गोविंदाला विजय मिळाला होता. त्यानंतर यावर्षी मार्च महिन्यात गोविंदाने शिवसेनेत प्रवेश केला.

Exit mobile version