25 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरक्राईमनामाअभिनेता दिलीप ताहील यांचा पुत्र ध्रुव ड्रग्स प्रकरणात अटकेत

अभिनेता दिलीप ताहील यांचा पुत्र ध्रुव ड्रग्स प्रकरणात अटकेत

Google News Follow

Related

चित्रपट अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या संशयास्पद मृत्यूनंतर सिनेक्षेत्रातील अनेकांची नावे अमली पदार्थ प्रकरणात चर्चेत आली. एकूणच चित्रपट क्षेत्राशी संबंधित अमली पदार्थ बाळगणाऱ्यांच्या विरोधात मोहीम तेज करण्यात आली. आता प्रसिद्ध अभिनेते दिलीप ताहील यांचा मुलगा ध्रुव ताहील याला अमली पदार्थ विभागाकडून अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

आरक्षणाची जबाबदारी ढकलायला मुख्यमंत्र्यांच्या लाईव्हचा खटाटोप

डॉक्टरांच्या बदनामीप्रकरणी हास्यकलाकार सुनील पालवर गुन्हा

देशमुखांविरुद्धच्या गुन्ह्यातील काही भाग वगळा!

भावी महिला पोलीसाला सोनसाखळी चोराचा हिसका

अमली पदार्थ विकणाऱ्याच्या अटकेनंतर अमली पदार्थ विभागाने ही कारवाई केली आहे. ध्रुव ताहील अशाच एका पेडलरच्या संपर्कात होता आणि त्याच्याकडून वारंवार अमली पदार्थांची मागणी करत होता त्या बदल्यात त्याने त्याला पैसे दिल्याचेही उघड झाले होते.

व्हाट्सएप चॅटिंग वरून अमली पदार्थ विभागाने कारवाई करत ध्रुव ताहील याला अटक केली. ३५ ग्रॅम एमडी अमली पदार्थ प्रकरणात या पथकाकडून मुजमिल अब्दुल रहमान शेख याला अटक करण्यात आली होती. त्याचा मोबाईल अमली पदार्थ विभागाने ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या व्हाट्सपवर ध्रुव ताहील यांच्यासोबतचे संभाषण या विभागाच्या हाती लागले. ज्यात ध्रुव ताहील त्याच्याकडे वारंवार त्या अमली पदार्थाची मागणी करत होता.

ध्रुव याने या ड्रग्ससाठी आरोपी मुजमिलच्या बँक खात्यात ऑनलाईन पैसेही ट्रान्सफर केले होते, असे तपासात स्पष्ट झालं त्यानंतर अमली पदार्थ विरोधी पथकाकडून ध्रुव ताहील याला अटक करण्यात आली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा