ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे. ललित पाटील आणि त्याच्या १२ साथीदारांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ललित अंमली पदार्थ विकून सोनं खरेदी करत होता. त्याच्याकडून पोलिसांनी आतापर्यंत एकूण ८ किलो सोनं जप्त केले आहे.
नाशिक मध्ये ललित पाटील ड्रग्स बनवण्याचा कारखाना चालवत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्यासाठी त्याची टीम देखील होती. अरविंदकुमार लोहरे आणि ललित पाटील हे टोळी प्रमुख होते. लोहरे हा एमडी बनवण्यात माहिर आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटीलकडून आणखी पाच किलो सोने जप्त करण्यात आले आहे.
ललित पाटीलकडून आणखी पाच किलो सोने जप्त करण्यात आले आहे. यापूर्वी कारवाईदरम्यान तीन किलो सोने जप्त करण्यात आले होते. एकूण आतापर्यंत ८ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. अंमली पदार्थ विकून मिळालेल्या पैशातून ललित पाटीलने हे सोने विकत घेतले होते, अशी माहिती समोर आली आहे. गुरुवारी पुणे पोलिसांची एक टीम ललित पाटील याला घेऊन नाशिक येथे पोहचली होती. त्यानंतर त्यांनी हे सोने जप्त केले. ललित पाटीलने एका व्यक्तीकडे हे सोने ठेवण्यासाठी दिले होते.
हे ही वाचा:
भारत- श्रीलंका सामन्यादरम्यान ११ विक्रम
‘मुली, मी तुला आशीर्वाद देतो, तुझे नाव लिही. मी तुला नक्की पत्र लिहीन’
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अखेर मागे; सरकारला २ जानेवारीपर्यंत दिला वेळ
याशिवाय ललित पाटील आणि टोळीवर पुणे पोलिसांनी संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यानुसार कारवाई केली आहे. विशेष न्यायालयात हा खटला चालविण्यात येणार आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटिलला तपासासाठी पुणे पोलिसांनी मुंबई पोलीसांकडून ताब्यात घेतले आहे. ललित पाटीलला ७ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.