भारत- नेपाळ सीमाभागातील २५० हून अधिक बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई!

योगी सरकारकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यास सुरुवात

भारत- नेपाळ सीमाभागातील २५० हून अधिक बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई!

उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने भारत नेपाळ सीमा भागात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. सीमावर्ती भागात सुरू केलेल्या या मोहिमेंतर्गत २५० हून अधिक बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. निवेदनानुसार, ही मोहीम अनधिकृत बांधकामे आणि धार्मिक संस्थांना लक्ष्य करून सीमेच्या १०- १५ किमी परिघात असलेल्या भागात केंद्रित करण्यात आली.

बहराइचमध्ये ८९ बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्यांवर आणि श्रावस्तीमध्ये ११९ बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्यात आली. सिद्धार्थनगर जिल्ह्यात ११ बेकायदेशीर बांधकामे हटवण्यात आली, तर महाराजगंजमध्ये १९ अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, बलरामपूरमध्ये सरकारी जमिनीवरील सात अतिक्रमणे ओळखून कारवाई करण्यात आली. यापैकी दोन स्वेच्छेने हटवण्यात आली आणि उर्वरित पाचवर कारवाई सुरू आहे, असे सरकारने स्पस्ज्त केले.

या महिन्याच्या सुरुवातीला, उत्तर प्रदेशचे अल्पसंख्याक कल्याण राज्यमंत्री, मुस्लिम वक्फ आणि हज दानिश आझाद अन्सारी यांनी या जमिनीवरील अतिक्रमण संपवण्याची गरज व्यक्त केली. तसेच वक्फ दुरुस्ती विधेयक ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. जानेवारीच्या सुरुवातीला, उत्तर प्रदेश पोलिसांनी गाझियाबादमधील विजयनगर परिसरातील लष्कराच्या जमिनीवरील बेकायदेशीर वसाहती हटविण्यासाठी अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू केली होती.

डीसीपी शहर राजेश कुमार सिंह म्हणाले की, परिसरातून सर्व बेकायदेशीर वसाहती हटवल्या जात नाहीत तोपर्यंत अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू राहील. “विजयनगर परिसरात, लष्कराच्या मालकीच्या जमिनीवर अनेक लोकांनी अतिक्रमण केले आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांकडून अतिक्रमण हटवण्याचे पत्र मिळाले आहे आणि म्हणूनच अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू केली आहे जोपर्यंत सर्व बेकायदेशीर वसाहती हटवल्या जात नाहीत तोपर्यंत मोहीम सुरू राहील,” असे सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा : 

सिंधू नदीतून भारतीयांचे रक्त वाहिले तर पाकिस्तानींचे रक्तही वाहील

सलग चौथ्या दिवशी पाकिस्तानकडून एलओसीवर शस्त्रसंधीचे उल्लंघन

घाटकोपर: सोमय्यांच्या तक्रारीनंतर मुस्लीम जमात गौसिया मशिदीचे भोंगे उतरवले!

विक्रोळीत १३ बांग्लादेशी फेरीवाले ताब्यात!

दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रशासनासह मार्चमध्ये फतेहपूरमधील हातगाव पोलिस स्टेशन परिसरातील एका कुख्यात गुन्हेगाराचे बेकायदेशीर बांधकाम पाडले. अधिकाऱ्यांच्या मते, हे बांधकाम सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे केले गेले होते. फतेहपूरचे पोलिस अधीक्षक (एसपी) धवल जयस्वाल म्हणाले की, हे बेकायदेशीर बांधकाम एका गुन्हेगाराचे आहे ज्याच्याविरुद्ध १२ हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

भारतमाता की जय नको! पाकिस्तान झिंदाबाद हवे ?  | Mahesh Vichare | Pahalgam Attack |

Exit mobile version