राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयए ॲक्शन मोडमध्ये आली असून खलिस्तानी दहशतवादी आणि गँगस्टर्स विरोधात कारवाईचा बडगा उघडला आहे. एनआयएकडून उत्तर प्रदेश, दिल्लीसह पाच राज्यांमध्ये छापेमारी सुरू आहे. या पाच राज्यांमध्ये ५० हून अधिक ठिकाणी छापेमारी केली जात आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये खलिस्तानी दहशतवादी आणि गँगस्टर्सच्या कुरापातींमध्ये वाढ झाल्याची माहिती एनआयएच्या हाती लागली असून खलिस्तानी दहशतवादी आणि गँगस्टर्स यांचा एकमेकांशी संबंध असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संबंधित तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
एनआयएकडून दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि राजस्थान या राज्यांत ५० हून अधिक ठिकाणी छापेमारी सुरु आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये अनेक गँगस्टर्स लूपन बसल्याची माहिती एनआयएकडे आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये अनेक कुख्यात गुंडांनी आश्रय घेतला असून त्यांचा संबंध खलिस्तानी दहशतवाद्यांशी असल्याचं सांगण्यात येत आहे. खलिस्तानी दहशतवादी विविध कारवायांसाठी गँगस्टर्सची मदत घेत असल्याची माहिती एनआयएकडे आहे. खलिस्तानी गँगस्टर्सकडून हे खलिस्तानी पैसे देऊन कारवाया करत आहेत. हा पैसा पाकिस्तानातून अंमली पदार्थ तस्करी करून मिळवला जात, असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा:
नाझी सैनिकाचा गौरव; कॅनडाच्या लोकसभा अध्यक्षाचा राजीनामा
इराकमध्ये लग्नसोहळ्यात लागलेल्या आगीत १०० ठार
गरवारे क्लब निवडणुकीत शरद पवारांना मोठा धक्का
… आणि पंतप्रधान मोदींनी थेट मनमोहन सिंग यांना केला फोन
भारताचा शेजारी पाकिस्तान खलिस्तानी-गँगस्टर्संनापैसा पुरविला जात असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानमधून भारतात अंमली पदार्थांची तस्करी करण्यासोबतच दहशतवादीही पाठविण्यात येत आहेत. या कामासाठी इस्लामी दहशतवाद्यांऐवजी खलिस्तानी दहशतवाद्यांची मदत घेतली जात आहे. कॅनडात बसलेले खलिस्तानी दहशतवादी आयएसआयच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.