समीर वानखेडे यांच्याविरोधात कठोर कारवाईचे आदेश

समीर वानखेडे यांच्याविरोधात कठोर कारवाईचे आदेश

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्लीनचिट दिली आहे. त्याच्याकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत, असे सांगत एनसीबीने आर्यन खानसह सहा जणांना क्लिनचिट दिली आहे. मात्र दुसरीकडे या प्रकरणाचा तपास करणारे माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे अडचणीत सापडले आहेत.

कॉर्डिलिया क्रूझवर केलेल्या कारवाईत आर्यन खानला क्लिनचिट दिल्यानंतर आता या प्रकरणात तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. त्यावेळी या प्रकरणात समीर वानखेडे तपासाची मागणी करत होते. त्यामुळे समीर वानखेडे आणि आर्यन खान प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. मात्र आता आर्यन खानला क्लीनचिट देण्यात आली असून, आता वानखेडेच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सरकारने समीर वानखेडे यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

कॉर्डिलिया क्रूझवर केलेल्या कारवाईत समीर वानखेडे यांनी आर्यन खान सह १४ जणांना ड्रग्स प्रकरणात अटक केली होती. आर्यन खानला आणि त्याचे मित्र अरबाज मर्चंट आणि मॉडेल मुनमुन धमेचा यांना एनसीबीने चौकशीदरम्यान गेल्या वर्षी अटक केली होती. त्यावेळी चार आठवडे आर्यन खान तुरुंगात होता. ३० ऑक्टोबर रोजी तो तुरुंगातून बाहेर आला होता. आता आर्यन खान सह सहा जणांना या प्रकरणात क्लीनचिट मिळाली आहे.

हे ही वाचा:

वीरप्पन गॅंग फुल फॉर्ममध्ये! मलनिस्सारण विभागात २१ हजार कोटींचा घोटाळा

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री चौटालांना चार वर्षांचा तुरुंगवास

‘मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला’

आर्यन खान सह ६ जणांना ड्रग्स प्रकरणात क्लीन चिट

दरम्यान, समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्र दाखवून नोकरी मिळवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तसेच आता निष्काळजीपणाने केलेल्या तपासाबद्दलही त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश सरकारने संबंधित यंत्रणेला दिले आहेत.

Exit mobile version