दुचाकीच्या मागे बसलेल्यांवर कारवाईचा बडगा; हेल्मेट न घातल्याची शिक्षा

दुचाकीच्या मागे बसलेल्यांवर कारवाईचा बडगा; हेल्मेट न घातल्याची शिक्षा

मोटारसायकलच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीला मुंबईत हेल्मेटसक्ती करण्यात आल्यानंतर गुरुवारी याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. मुंबई वाहतूक विभागाने गुरुवारी दिवसभरात मुंबईत अशा हेल्मेट न घालता मागे बसलेल्या ३४२१ व्यक्तींसह ६२७१ जणांवर विनाहेल्मेटची कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने १५ दिवसांपूर्वी मोटारसायकलच्या मागे बसणाऱ्या माणसाला देखील हेल्मेटसक्तीचे पत्रक काढले होते. या पत्रकाची अमलबजावणी गुरुवार पासून सुरू करण्यात आली असून गुरुवारी दिवसभरात वाहतूक विभागाने मुंबईभरात विना हेल्मेट मोटारसायकल चालविणारे तसेच विना हेल्मेट मागे बसलेल्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

मुंबईत असे हेल्मेट न घालता मागे बसलेले ३४२१ जण तसेच २३३४ विना हेल्मेट वाहन चालविणारे आणि दोघेही विना हेल्मेट मोटारसायकल असणारे ५१६ असे एकूण ६२७१ जणांवर प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

वाहतूक विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हेल्मेट न घालता मागे बसलेल्यांवर मुंबईत करण्यात आलेल्या हेल्मेटसक्तीच्या नियमात लवकरच थोडासा बदल करण्यात येणार आहे, मागे बसलेल्यासाठी मुंबईत हेल्मेटसक्ती नसणार मात्र पूर्व आणि पश्चिम महामार्गावर हेल्मेटसक्ती करण्यात येणार असून आहे. सायन पासून मुलुंड टोलनाका पर्यत पूर्व महामार्गावर तसेच वांद्रे पासून दहिसर टोलनाका पर्यत ही हेल्मेटसक्ती असणार आहे.

हे ही वाचा:

४ तासांत दोन हत्यांच्या घटनेने मुलुंड हादरले!

मोबाईल काढून घेतला म्हणून मुलाची आत्महत्या

कामाला उशीर झाल्याने तुडुंब भरलेल्या बसला थांबवून त्याने काच फोडली!

केतकी चितळे ठरली राष्ट्रवादीपेक्षा सरस!

 

या हेल्मेटसक्तीवर विविध प्रतिक्रिया उमटत असून मागे बसलेल्यांना हेल्मेट सक्तीचे केल्यास अशी दोन हेल्मेट बाळगावी लागतील. शिवाय, जे हेल्मेट बाळगले असेल ते सर्वांना सारखेच डोक्यात अचूक बसेल याची खात्री नाही. त्यामुळे नको तो मनस्ताप होणार आहे, असेही दुचाकींच्या मालकांचे मत आहे.

Exit mobile version