गडचिरोली पोलीस दलाने मोठी कारवाई करत सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या दोन जहाल महिला माओवाद्यांना अटक केली आहे. पोलीस दलाने रविवार, ७ एप्रिल रोजी ही कारवाई करत अटक केली आहे. या दोन जहाल महिला माओवाद्यांवर सरकारने साडे पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विघातक कृत्य करण्याच्या तसेच सुरक्षा दलाच्या हालचालींचा आढावा घेण्याच्या हेतूने जहाल महिला माओवादी काजल ऊर्फ सिंधू गावडे (वय २८) आणि गीता ऊर्फ सुकली कोरचा (वय ३१) या दोघी गडचिरोली- कांकेर (छत्तीसगड) सीमेवरील पिपली बुर्गी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जवेली जंगल परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर तातडीने पोलिसांनी कारवाई करत या दोघींना ताब्यात घेतले. विशेष अभियान पथकाचे जवान, पिपली बुर्गी पोलीस ठाण्याचे जवान तसेच केंद्रीय राखीव पोलीस बल जी- १९२ बटालियनच्या जवानांनी या जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान राबवून त्यांना ताब्यात घेतले.
काजल हिचा २०१९ मध्ये नारकसा जंगल परिसरातील चकमक, २०१९ मध्ये दराची सिंदेसुर जंगल परिसरातील चकमक, २०१९ मध्ये बोधीनटोला जंगल परीसरातील चकमक, २०२०मध्ये किसनेली पहाडी जंगल परिसरातील चकमक, २०२१ मध्ये फुलकोडो जंगल परिसरातील चकमक, २०२१ मध्ये खोब्राामेंढा जंगल परिसरातील चकमक, २०२१ मध्ये मोरचूल जंगल परिसरातील चकमक यात सहभाग होता.
हे ही वाचा..
‘मी गोमांस खात नाही…गर्व आहे मला हिंदू असल्याचा’!
इस्रायल-हमास युद्ध: एक ब्रिगेड वगळता दक्षिण गाझामधून इस्रायलचे सर्व सैन्य माघारी!
‘काँग्रेस पक्ष माजी मंत्र्यांच्या खासगी सचिवांकडून चालवला जातो’
आत्महत्येपूर्वी सलग २९ तास अनन्वित छळ!
तर, गीता हिचा २०१९ मध्ये मोरोमेट्टा – नेलगुंडा जंगल परीसरात पोलिसांसोबत झालेली चकमक, २०२० मध्ये कोपर्शी-पोयारकोटी जंगल परिसरातील चकमक, २०२१ मध्ये कोपर्शी जंगल परिसरातील चकमक यात सहभाग होता. तसेच २०२० मध्ये कोठी येथे झालेल्या एका पोलिस जवानाच्या हत्येमध्ये तसेच २०२१ मध्ये कोठी ते भामरागड रोडवर झालेल्या एका निरपराध व्यक्तीच्या हत्येमध्ये तिचा सहभाग होता.