23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामादादरमध्ये निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून १ लाख ८० हजार रुपयांची रोकड जप्त

दादरमध्ये निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून १ लाख ८० हजार रुपयांची रोकड जप्त

मुंबईसह राज्यभरात नाकाबंदी

Google News Follow

Related

देशात साध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून आदर्श आचारसंहिता देशभरात सुरू आहे. या आचारसंहिता काळात रोख रक्कम बाळगण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच यावर लक्ष राहावे म्हणून आचारसंहिता काळात निवडणूक आयोगाचे पथक, पोलीस आणि आयकर विभागाची नजर बेकायदेशीर रक्कम बाळगण्यावर असते. आतापर्यंत राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी या यंत्रणांनी कारवाई करत रोकड जप्त करण्याचे काम केले आहे.

दरम्यान, दादरमधून रोख रक्कम बाळगल्याप्रकरणी कारवाई झाल्याची बातमी समोर आली आहे. दादरमध्ये निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. दादरच्या शिंदे वाडी परिसरात लाखो रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. जवळपास १ लाख ८० हजार रुपयांची ही रोख रक्कम होती. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लावण्यात आलेल्या नाकाबंदीत एका वाहनात ही रक्कम सापडली.

माहितीनुसार, दादरच्या शिंदे वाडी परिसरात एक गाडीमध्ये १ लाख ८० हजाराची रोकड निवडणूक भरारी पथकाने भोईवाडा पोलिसांच्या मदतीने जप्त केली आहे. नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी गाडी अडवून तपासणी केली असता गाडीत १ लाख ८० हजारची रोकड होती. या पैशांबाबत चालकाकडे कोणतीही कागदपत्रे आढळून न आल्याने पोलिसांनी निवडणूक भरारी पथकाच्या मदतीने कारवाई केली आहे.

हे ही वाचा:

काँग्रेसकडून पोस्ट करण्यात आलेल्या अमित शाह यांच्या एडिटेड व्हिडीओविरोधात गुन्हा दाखल

मोदी कन्नडिगांना पापी म्हणत असणारा एडिटेड व्हिडीओ प्रियांक खरगेंकडून व्हायरल

देबश्री चौधरींचे पोस्टर लावताना भाजपा नेत्या सरस्वती सरकार यांच्यावर प. बंगालमध्ये हल्ला

काँग्रेस संपत्तीच्या वाटणीसाठी वक्फ नव्हे, अन्य समुदायांची संपत्ती घेईल

निवडणूक काळात पैशांच्या अवैध वाहतुकीवर यंत्रणा विशेष लक्ष ठेवून आहेत. यासाठी मुंबईसह राज्यभरात ठिकठीकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. निवडणूक काळात प्रामुख्याने रोकड, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान वस्तूंची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत असते. मुंबईत राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून तसेच बाहेरील राज्यांमधून दररोज अनेक गाड्यांची वाहतूक होत असते. त्यामुळे मुंबई शहर, उपनगर यांच्या एन्ट्रीवर नाकाबंदी करण्यात आली असून गाड्यांची कसून तपसणी करण्यात येत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा