महसूल गुप्तचर संचालनालय म्हणजेच डीआरआयने मुंबईत मोठी कारवाई करत काही ठिकाणी छापेमारी केली आहे. डीआरआयने मुंबईतील वर्सोवा आणि झवेरी बाजार येथे छापे मारले आहेत. या कारवाई दरम्यान डीआरआयने सोनं जप्त केलं आहे. तस्करी करण्यासाठी परदेशातून भारतात आणलेलं २४ किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. तसेच या प्रकरणी पाच जणांना अटक देखील करण्यात आली आहे.
डीआरआयने झवेरी बाजार, मुंबादेवी आणि वर्सोवा परिसरात छापेमारीची कारवाई केली. चोरीच्या मार्गाने सोनं तस्करी करुन भारतात विकलं जात असल्याची माहिती मिळाली होती. डीआरआयला ही गुप्त माहिती मिळताच कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेला आरोपी समीर मर्चंट याला यापूर्वीही आधीही परदेशी चलन भारतात आणल्याप्रकरणी एकदा अटक झाली होती.
हे ही वाचा :
अपहरण, खंडणी प्रकरणी माजी खासदार धनंजय सिंह यांना सात वर्षांना तुरुंगवास
पंतप्रधानांची दक्षिण मोहीम; भाजपला ३० जागा मिळण्याची शक्यता
मलाही मुसेवाला-नफेसिंगप्रमाणे मारतील!
आरोपीचे आधीचे नाव अफझल बटाटावाला उर्फ समीर मर्चंट आणि त्याची पत्नी मिळून हे सिंडिकेट चालवत होते. डीआरआयने या कारवाईत २४ किलो सोनं आणि २ कोटी रोख रक्कम तसेच ४६०० पौंडसुधा जप्त केले.