25 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरक्राईमनामाआरजी कार कॉलेजच्या माजी प्राचार्यांचे इंडियन मेडिकल असोसिएशनकडून सदस्यत्व रद्द

आरजी कार कॉलेजच्या माजी प्राचार्यांचे इंडियन मेडिकल असोसिएशनकडून सदस्यत्व रद्द

पॉलिग्राफ टेस्टच्या दुसऱ्या दिवशीचं केली कारवाई

Google News Follow

Related

पश्चिम बंगालच्या आरजी कार मेडिकल कॉलेजमधील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर पश्चिम बंगालसह संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी पश्चिम बंगालमध्ये वातावरण पेटलेले असतानाचं आता या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. आरजी कार मेडिकल कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य संदीप घोष यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने संदीप घोष यांचे सदस्यत्व निलंबित केले आहे. एएनआयने या संदर्भात वृत्त दिले आहे.

आयएमए मुख्यालयातून राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आर व्ही अशोकन यांनी एक समिती स्थापन केली होती. आईएमए कोलकाता शाखेचे घोष हे उपाध्यक्ष होते. त्यांचे सदस्यत्व निलंबित करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडे वर्ग केलेला असून सीबीआयने घोष यांची पॉलिग्राफ टेस्ट घेतली होती. त्याच्या दुसऱ्याचं दिवशी ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या बलात्कार-हत्येप्रकरणाच्या निषेधार्थ मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांनी ‘नबन्ना अभियान’ मोर्चाचे आयोजन केले होते. त्यानुसार आंदोलक विद्यार्थ्यांनी पश्चिम बंगाल सरकारच्या सचिवालयाच्या दिशेने कूच केली. मात्र, पोलिसांनी लाठीचार्ज, अश्रूधुराच्या नळकांड्या आणि पाण्याचा मारा करत आंदोलकांना पांगवले. एवढेच नाही तर आंदोलनात सहभागी असलेल्या एकूण २०० हून अधिक लोकांना ताब्यात घेतले. कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी विद्यार्थी संघटनांनी काढलेल्या निषेध मोर्चानंतर भाजपाने बुधवारी १२ तासांच्या बंगाल बंदची हाक दिली होती. बंद दरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये पोलीस आणि भाजपा समर्थकांमध्ये हिंसक घटना घडल्याचे दिसून आले. शिवाय अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हे ही वाचा..

भाजपच्या भरत राजपूत यांना नालासोपाऱ्यात प्रतिसाद

देशभरात १२ औद्योगिक स्मार्ट शहरे उभारणार

जे जे रुग्णालयात अँटीमायक्रोबायोल इमर्जन्सी रूमचे उद्घाटन

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आसाराम बापू पाच दिवसांच्या पॅरोलवर बाहेर

भाटपारा येथे भाजपा नेते प्रियंगू पांडे यांच्या गाडीवर गोळीबार झाला. टीएमसीच्या सुमारे ५० ते ६० लोकांनी हल्ला केला. वाहनावर सहा ते सात राउंड फायर करण्यात आले आणि बॉम्ब फेकण्यात आले. चालकासह दोघांना गोळ्या लागल्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा