बापलेक बनावट ब्रँडच्या कपड्यात गुंडाळत होते ग्राहकांना

बापलेक बनावट ब्रँडच्या कपड्यात गुंडाळत होते ग्राहकांना

बनावट कपडे विक्री करणाऱ्या एका दुकानावर तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. तुर्भे येथील पुनित इंडस्ट्रीजमधील एका दुकानातून पोलिसांनी १० लाख अठरा हजार रुपये किमतीचे बनावट कपडे जप्त केले आहे. बनावट मालाची विक्री करणाऱ्या पिता व मुलगी या दोघांविरोधात फसवणुकीसह कॉपीराईट कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. कपड्यांवर आदिदास, पुमा तसेच लिवाइस या ब्रँडच्या नावांचा आणि चिन्हांचा वापर केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

तुर्भेतील पुनित इंडस्ट्रीजमधील १०१ ए क्रमांकाच्या गाळ्यामध्ये ब्रँडेड कंपनीच्या नावाने बनावट कपडे तयार करून त्यांची विक्री करण्यात येत असल्याची माहिती पुमा कंपनीचे स्वामित्व हक्क असलेले प्रतिनिधी दिलीपकुमार सुवर्णकार यांना मिळाली. दिलीपकुमार यांनी परिमंडळ- १ चे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्याकडे तक्रार केली. उपायुक्त मेंगडे यांनी तुर्भे एमआयडीसी पोलिसांना संबंधित गाळ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी पुमा कंपनीच्या प्रतिनिधींसह तुर्भेतील पुनित इंडस्ट्रीजमधील १०१ ए क्रमांकाच्या गाळ्यावर छापा मारला.

हे ही वाचा:

अखंड भारत संकल्प दिन म्हणजे नेमके काय रे भाऊ?

पर्यावरण संरक्षणासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

तालिबान अफगाणिस्तानवर कब्जा करण्याच्या उंबरठ्यावर

नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचा मार्ग ठरला

या गाळ्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे कपडे तयार करण्याचे आणि त्या कपड्यांवर कंपनीचे नाव आणि चिन्ह प्रेस करून छापण्यात येत असल्याचे आढळून आले. पुमा, आदिदास, लिवाइस आणि ईएमयू या ब्रँडेड कंपन्यांचे कपडे ठेवल्याचे आढळून आले. तिथे काम पाहणाऱ्या नित्या नाडार हिच्याकडे ब्रँडेड कपडे बनण्याच्या परवान्याबद्दल चौकशी केली असता, त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे समोर आले. या कारवाईमध्ये पोलिसांनी १० लाख १८ हजार रुपये किमतीचे कपडे जप्त केले.

Exit mobile version