धक्कादायक! त्याने केला महिलेवर ऍसिड हल्ला

धक्कादायक! त्याने केला महिलेवर ऍसिड हल्ला

रिक्षाची वाट पहात उभ्या असलेल्या ३८ वर्षीय एका महिलेवर ऍसिडने भरलेल्या फुग्याने हल्ला केल्याची खळबळजनक घटना अंधेरी पूर्व येथे रविवारी रात्री घडली. या ऍसिड हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा ऍसिड हल्ला बलात्कार आणि खंडणीचा गुन्हा मागे घेण्यात यावा या कारणावरून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

या प्रकरणी अंधेरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे. अंधेरी पूर्व सहार येथे राहणाऱ्या जखमी महिला या कमर्शियल प्रॉपर्टी कन्सल्टन्ट आहेत. रविवारी रात्री जखमी महिला कार्यालयाच्या कामानिमित्त घराबाहेर पडल्या होत्या, कामे आटोपून त्या रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घरी येण्यासाठी अंधेरी घाटकोपर लिंक रोडवर रिक्षाची वाट पहात उभ्या होत्या. त्याच वेळी एक अनोळखी इसम फुटपाथवरून या महिलेच्या दिशेने चालत आला आणि त्याने काही कळण्याच्या आत सोबत आणलेल्या ऍसिडचा फुगा या महिलेच्या दिशेने भिरकावला व त्याहून जाताना त्याने ‘बॉबी का एफ आय आर वापस ले’ अशी धमकी देऊन तेथून निघून गेला.

या ऍसिड हल्लात या महिलेचे दोन्ही पाय गंभीररीत्या भाजले, त्याच वेळी इतर पादचाऱ्यांच्या ताबडतोब त्या ठिकाणी येऊन पोलिसाना कळवले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी जखमी महिलेला उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल केले.

हे ही वाचा:
गर्भवती महिलेने आपल्या मुलीची हत्या का केली?

ते पाठीवर हात ठेऊन फक्त लढ म्हणाले

…त्या १५० शिक्षकांसाठी तीव्र आंदोलन

स्वागत!! ऑलिम्पिकवीरांनी क्रिकेटपटूंना टाकले मागे

या महिलेने पोलिसांना दिलेली जबाबात बॉबी आणि तिच्या मित्राविरुद्ध जखमी महिलेने दोन महिन्यापूर्वीच मालवणी पोलीस ठाण्यात बलात्कार आणि खंडणीची तक्रार दाखल केली असून या प्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात बॉबी आणि तिच्या सहकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. याच वादातून तिच्यावर ऍसिड हल्ला झाला असावा अशी शक्यता तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात वर्तवली आहे. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Exit mobile version