पोलिसांच्या तावडीतून पळून गेलेला आरोपी सापडला राजस्थानात

लघुशंकेचे कारण सांगून मंगळवारी पोलिसांच्या तावडीतून पळ काढला

पोलिसांच्या तावडीतून पळून गेलेला आरोपी सापडला राजस्थानात

अंधेरी पश्चिम येथील दादाभाई नौरोजी नगर पोलीसांच्या तावडीतून पळून गेलेल्या सराईत आरोपीला गुन्हे शाखा कक्ष ९ च्या पथकाने राजस्थानमधून अटक केली आहे. मोहम्मद अन्सारी (३०) असे आरोपीचे नाव आहे. मंगळवारी सकाळी लघुशंकेचा निमित्त करून त्याने पोलिसांच्या तावडीतून पळ काढला होता.

मोहम्मद अन्सारीला फसवणुकीच्या एका गुन्ह्यात मुंबई गुन्हे शाखा कक्ष २ च्या पथकाने गेल्या आठवड्यात अटक केली होती. सोमवारी अंधेरी डीएन नगर पोलिसांनी गुन्हे शाखेकडून २०२३च्या फसवणुकीच्या गुन्ह्यात अन्सारीचा ताबा घेतला होता. अन्सारी २०२३ च्या फसवणूक गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार होता. त्याने आणि त्याच्या साथीदारांनी “भारतीय चलनाच्या बदल्यात स्वस्त दरात डॉलर्स देण्याची ऑफर देऊन लोकांची फसवणूक केली होती.

हे ही वाचा:

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध

बांगलादेशातील हिंदू, महिला अत्याचार, समान नागरी कायदा…पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून केले परखड भाष्य !

भारताची कुस्तीगीर विनेश फोगाटला पदक नाही; अपील फेटाळले

लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला महाराष्ट्रातील मान्यवर राहणार उपस्थित

अटक करण्यात आलेल्या अन्सारीने मंगळवारी लघुशंकेचे कारण सांगून मंगळवारी पोलिसांच्या तावडीतून पळ काढला होता, आरोपी पळून गेल्याचे कळताच पोलिसांनी त्याच कसून शोध सुरू केला, गुन्हे शाखा कक्ष ९च्या पथकाने अन्सारीचा शोध घेत राजस्थानच्या कोटा रेल्वे स्थानाकातून त्याला बुधवारी ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे पथक आरोपीला घेऊन मुंबईकडे रवाना झाले असून गुरुवारी त्याला मुंबईत आणून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Exit mobile version